Admission Process : पुढील आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

Admission Process News
Admission Process Newsesakal
Updated on

Jalgaon News : बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. पारंपारीक कला, विज्ञान, वाणिज्य पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यापसून सुरू होणार आहे.

गेल्या काही वर्षांत प्रवेशासाठी शहरात अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सर्वच अभ्यासक्रमांत अनुदानितसह विनाअनुदानित पर्याय वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश सोपा झाला आहे. (Next week Admission process will start Degree courses BSc B.Com Professional Courses Like by Students Jalgaon News)

बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.), बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) व व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल वाढला आहे.

बारावीची गुणपत्रीका उपलब्ध झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती येईल. सीईटीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.

शहरातील महाविद्यालयांत सुमारे साडेतीन हजारांवर प्रवेश क्षमता आहे. बारावीचा निकाल २५ मेस आनलाईन जाहीर झाला. त्यात ४३ हजार ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Admission Process News
Jalgaon News : नशिराबाद-तरसोदमध्ये पाण्यावरून पेटणार संघर्ष? अधिकाऱ्यांच्या चुकीने समस्या

बारावी विज्ञान शाखेत सर्वाधिक मार्क असणारे विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रीकी शिक्षणाकडे वळतात.

त्यासाठी होणाऱ्या प्रवेशपूर्व परिक्षेच्या (सीईटी) निकालाची मात्र विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे. व्यवस्थापन, संगणकाशी निगडीत बीबीए, बीसीए, बीसीएस या व्यावसायीक अभ्यासक्रमांकडेही नोकरीच्या संधींमुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने वळत आहेत.

विद्यार्थी विविध अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांची माहिती घेत आहेत. महाविद्यालयांनी प्रवेशाची तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

Admission Process News
New Parliament Inauguration:सेंगोल समोर मोदींचे दंडवत, संसदेत केली प्रतिष्ठापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.