Jalgaon Loksabha Election: राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आहे. तिन्ही पक्ष मिळून लोकसभेच्या निवडणूका लढणार आहे.
वरिष्ठ स्तरावर जागावाटपाची चर्चा सुरू असून, आम्ही मागणी केल्याप्रमाणे जळगाव लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटच लढणार, त्याबाबत वरिष्ठांनी सहमती दिली असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी केला आहे. (Nilesh Patil statement Jalgaon Lok Sabha Shinde group will contest jalgaon news)
जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू असल्याचे सांगून नीलेश पाटील म्हणाले, आम्ही विधानसभानिहाय बैठकाही सुरू केल्या आहेत. पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आम्ही २७ डिसेंबरला भव्य मेळावा आयोजित केला होता; परंतु तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. पुढे तो घेण्यात येणार आहे.
शिवसेना शिंदे गटाची मोठी ताकद
जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाची मोठी ताकद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, जळगाव लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. भाजपचे केवळ दोनच आमदार आहेत. अमळनेर, चाळीसगाव तालुक्यातही पक्षाची ताकद चांगली आहे. तर जळगाव शहरात आमच्या पक्षाची ताकद आहे.
पंचायत समिती स्तरावरही आमची ताकद मोठी आहे. पारोळा, पाचोरा तालुक्यांतील पंधरा पंचायत समित्या आमच्या ताब्यात होत्या; आमच्या ताकदीच्या बळावर आम्ही मागणी करीत आहोत. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरही आम्ही अहवाल पाठविला आहे. त्यांनी मान्य केला आहे.
सर्व्हेत भाजपचा उमेदवार पिछाडीवर
जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. याबाबत नीलेश पाटील म्हणाले, की होय, भाजपचा खासदार आहे; परंतु एका माध्यमाने केलेल्या सर्व्हेत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठी असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर दावा करीत आहोत.
आर. ओ. तात्यांचीही इच्छा
शिवसेना नेते व माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याची मागणी केली होती. त्यांनी लोकसभा लढण्याची तयारीही सुरू केली होती. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, अन्यथा त्याच वेळेस ही जागा शिवसेनेने लढविली असती. आता या जागेसाठी मागणी करीत आहोत.
उमेदवार कोण असणार?
शिवसेना शिंदे गट जळगाव लोकसभेचा दावा करीत आहे; परंतु आपल्याकडे उमेदवार आहे काय? याबाबतीत बोलताना ते म्हणाले, की आमच्याकडे उमेदवारीसाठी अनेक जण आहेत. आपणही उमेदवारीसाठी इच्छुक आहोत; परंतु याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.