NMU Agitation News : प्रश्नपत्रिका घोटाळ्याचा युवासेना, युवक काँग्रेसतर्फे निषेध

NMU News
NMU Newsesakal
Updated on

Jalgaon News : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा युवासेना, युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका वापरण्यात आल्या आहेत.

२०२१-२२ मधील प्रश्नपत्रिका यंदा २०२२-२३ च्या परीक्षेतही वापरण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रश्नपत्रिकेत नव्याने प्रश्नपत्रिका तयार केल्या जात नसतील, तर विद्यार्थ्यांनचे परीक्षा निधी अंतर्गत जो पैसा जमा होतो त्याचे काय? अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन सरसकट पासच करायचा दृष्टिकोन यामधून दिसून येतो. (NMU Agitation News Question paper scam protest by Yuva Sena Yuva Congress Jalgaon News)

यातून मुलांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

आणि या घटनेची जबाबदारी निश्चित करून संदर्भीय शाखाधिकारी परीक्षा विभाग अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी युवासेना व युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले.

या वेळी विद्यापीठ सिनेट सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, उपजिल्हा प्रमुख विशाल वाणी, जिल्हा चिटणीस अंकित कासार, महानगरप्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अमित जगताप, महानगर समन्वयक महेश ठाकूर, शहरप्रमुख गिरीश कोल्हे, उपमहानगर प्रमुख राहुल शिंदे व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMU News
Nashik News : देवळाली व्यापारी बॅकेची पंचवार्षिक निवडणुक संपन्न; असे झाले मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.