NMU Authority Election : विद्यापीठ कार्यक्षेत्रात 97 टक्के मतदान

NMU latest marathi news
NMU latest marathi newsesakal
Updated on

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी रविवारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १९ मतदान केंद्रातील २५ बुथवर सरासरी ९७% मतदान झाले. सर्व मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत मात्र उत्साहाने मतदान झाले.

अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या प्राधिकरणासाठी ही निवडणूक झाली. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही मतदानाची वेळ होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील १९ मतदान केंद्रातील २५ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सगळीकडे शांततेत मतदान झाले. (NMU Authority Election 97 percent voting in university area Jalgaon News)

NMU latest marathi news
Nashik News: बसगाड्या धावतात फलकाविना! बस कोठून कोठे जाणार हे कळून येत नसल्याने प्रवाशांची अडचण

सकाळी १० वाजेपर्यंत बहूसंख्य मतदान केंद्रावर २५% पर्यंत मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सकाळी ९ वाजता जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयातील मतदान केंद्राला भेट दिली.

या मतदान केंद्रातील तीनही बुथवर जावून त्यांनी पाहणी केली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या मतदान केंद्राला देखील त्यांनी भेट दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

सर्व मतदान केंद्रातील चोख व्यवस्था पाहून मतदारांनी समाधान व्यक्त केले. मंगळवार दि. १० जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

NMU latest marathi news
Dhule News : महापालिकेचे थकबाकी दारांकडून 100 कोटी येणे

अधिसभेसाठी व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटातून ४ जागांसाठी ६ उमेदवार, महाविद्यालय अध्यापकांच्या गटातून १० जागांसाठी २६ उमेदवार, प्राचार्यांच्या गटातून ५ जागांसाठी ७ उमेदवार, विद्यापीठ अध्यापकांच्या गटांमधुन ३ जागांसाठी ७ उमेदवार अशा एकुण अधिसभेच्या २२ जागांसाठी ४६ उमेदवार उभे आहेत. तर विद्यापरिषदेच्या ४ जागांसाठी ९ उमेदवार आहेत. विविध विषयांच्या १३ अभ्यासमंडळांसाठी ६० उमेदवारांनी निवडणूक लढविली.

असे झाले मतदान

रविवारी झालेल्या निवडणुकीत ५७ विद्यापीठ अध्यापकांपैकी ५६ अध्यापकांनी मतदान केले(९८ टक्के). ५७ प्राचार्यांपैकी ५६ प्राचार्यांनी मतदान केले (९८ टक्के). १८७१ महाविद्यालयीन अध्यापकांपैकी १८०८ अध्यापकांनी (९७ टक्के) तर ८४ व्यवस्थापन प्रतिनिधींपैकी ७९ (९४ टक्के) व्यवस्थापन प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. १३ अभ्यासमंडळांसाठी ४९६ मतदारांपैकी ४९० मतदारांनी मतदान केले. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सरासरी एकूण मतदान ९५ टक्के झाले होते. यावेळी त्यामध्ये वाढ झालेली दिसून आली.

NMU latest marathi news
Nashik News : उद्यान नागरिकांसाठी की गावगुंड, मद्यपींसाठी; वावरेनगरातील रहिवाशांचा संतप्त सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()