जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ जानेवारीस होणाऱ्या अधिसभा निवडणुकीसाठी अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने १० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे.
विद्यापीठ विकास मंचच्या पॅनल मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून दिनेश उत्तम खरात (अक्कलकुवा जि. नंदुरबार), भटक्या जाती प्रवर्गातून दिनेश दलपत चव्हाण (मुक्ताईनगर), अनुसूचित जमाती प्रवर्गातून नितीन लिलाधर ठाकूर (धुळे), इतर मागास प्रवर्गातून नितीन छगन झाल्टे (जामनेर), महिला प्रवर्गातून स्वप्नाली तुळशीराम महाजन (जळगाव), खुल्या प्रवर्गातून ५ उमेदवार निवडून द्यायचे असून त्यात अमोल साहेबराव मराठे (शिंदखेडा, जि. धुळे), अमोल नाना पाटील (भडगाव), निलेश रमणराव झोपे (जळगाव), सुनील राजधर निकम (चाळीसगाव) अमोल मुरलीधर सोनवणे (शिरपूर) यांचा समावेश आहे. (NMU Election News Candidates of University Development Forum announced campaigning started Jalgaon News)
प्रचाराचा शुभारंभ
विद्यापीठ विकास मंच उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज जुने जळगाव येथील श्रीराम मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला. विद्यापीठ विकास मंचच्या १० उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत प्रत्यक्ष मतदारांची भेट घेण्यात आली.
याप्रसंगी आमदार राजुमामा भोळे, उमेदवार माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, सिनेट सदस्या नेहा जोशी, माजी सिनेट सदस्या मनिषा खडके, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे, नगरसेवक सुनिल खडके, कैलास सोनवणे, पिंटू काळे, अमित काळे, शुचिता हाडा, गायत्री राणे, भाजयुमोच्या भैरवी वाघ-पलांडे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सागर येवले, अतुल हाडा, विक्रांत पाटील, डॉ विरेन खडके, धनंजय खडके यांच्यासह अभाविप, विविमंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.