NMU Election Result : उमविचे प्रा. मनीष जोशी UGC सचिवपदावर

Proffesor. Manish Joshi
Proffesor. Manish Joshiesakal
Updated on

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. मनीष जोशी यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिव पदी निवड झाली आहे. खानदेशाला प्रथमच हा सन्मान प्राप्त झाला असून विद्यापीठाच्या लौकिकात भर पडली आहे.

प्रा. मनीष जोशी हे १९९७ पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत अध्यापक म्हणून कार्यरत असून संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख पद त्यांचेकडे आहे. जळगावच्या भगीरथ शाळा, नुतन मराठा महाविद्यालयात त्यांनी प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून घेतले. (NMU Election Result NMU Professor Manish Joshi Selected as UGC Secretary Jalgaon News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Proffesor. Manish Joshi
Crime News : प्रेम प्रकरणातून 20 वर्षाच्या युवकाचा घोटला गळा; परखंदीत अभिषेकची निर्घृण हत्या

२००८ मध्ये त्यांनी कॅनडा येथील विद्यापीठातून पोस्ट डॉक्टेरेट पूर्ण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून दोन विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. संगणक विषयक दोन मोठे आणि एक लघुसंशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक तसेच विद्यापीठातील स्वामी विवेकानंद संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. प्रा. मनीष जोशी यांची पाच वर्षांसाठी प्रतिनियुक्ती आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी त्यांचा सत्कार केला.

Proffesor. Manish Joshi
Jalgaon News : कौटुंबीक न्यायालयाच्या अधीक्षकाला लाच घेताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.