Jalgaon NMU News : ‘युवा संवाद @ २०४७’मध्ये होणार मंथन; ‘उमवि’त आज चर्चासत्र

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवारी (ता. २२) जी-२० ‘युवा संवाद @ २०४७’ संमेलन होणार आहे. ‍या संमेलनाची तयारी पूर्ण झाली.

केंद्र सरकारचे युवक व क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा कार्यक्रम होणार आहे.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तिन्ही जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयातील एक हजार ५०० विद्यार्थी या संमेलनात सहभागी होतील. (NMU will hold G20 Yuva Samvad @ 2047 conference today jalgaon news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणात देशातील नागरिकांना पंचप्रण (संकल्प) दिले आहेत. त्यात विकसित भारताचे ध्येय, गुलामगिरी किंवा वसाहतवादी मानसिकतेची चिन्हे काढून टाकणे, तेजस्वी वारशाचा अभिमान बाळगणे, एकतेचे सामर्थ्य आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रुजविणे यांचा समावेश आहे. या संमेलनात २५ निवडक विद्यार्थ्यांना अमृत काळातील पंचप्रण यावर सादरीकरणाची संधी मिळेल.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी असतील. खासदार रक्षा खडसे व आमदार मंगेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांचे बीजभाषण होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : ‘उमवि’ संलग्न 24 महाविद्यालयांना ‘नो ॲडमिशन’चा दणका; नॅक मूल्यांकन टाळणे महागात

या वेळी प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. दुपारी विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. केशवस्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.

दुपारी चारला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. या वेळी खासदार उन्मेष पाटील, प्र-कुलगुरू इंगळे यांची उपस्थिती असेल. उपस्थितीचे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील, समन्वयक अॅड. अमोल पाटील, ‘रासेयो’चे संचालक डॉ. सचिन नांद्रे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जे. डी. लेकुरवाळे यांनी केले आहे.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : बहिणाबाई चौधरी, साने गुरुजींच्या नावाने शिष्यवृत्ती; संशोधनास मिळणार प्रोत्साहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.