Jalgaon News : भुईकोट किल्ल्यावर शौचालय नकोच; दुर्गप्रेमींसह पारोळेकरांचा विरोध

While inspecting the ongoing works in the fort area, P. G. Local residents including Patil, Deepak Ritual.
While inspecting the ongoing works in the fort area, P. G. Local residents including Patil, Deepak Ritual.esakal
Updated on

Jalgaon News : येथील भुईकोट किल्ला हा रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरच्यांनी बांधलेला किल्ला असून तो राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरघर म्हणून संबोधला जातो. या ठिकाणी जनसुविधा केंद्र व सुलभ शौचालयाची निर्मितीसाठी कामाला सुरुवात झाली आहे.

या कामाला शिवप्रेमींसह स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. (No toilet at Bhuikot fort opposition of Parolekars jalgaon news)

जनसुविधा केंद्राच्या नावाखाली शौचालयाचे काम होत असल्याने या कामाबाबत सध्या तरी संभ्रम निर्माण झाला आहे. किल्ल्यावर शौचालयाच्या बांधकामाला दुर्गप्रेमींनी मात्र तीव्र विरोध केला आहे.

काही महिन्यांपूर्वी ५ डिसेंबर २०२२ ला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्‍यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक झाली होती. यात पुरातत्व विभागासाठी पर्यटनाचा विकास व्हावा, या उद्देशाने ७५ राज्य संरक्षित स्मारकांची निवड करण्यात आली होती. यात नाशिक पुरातत्व विभागातून १४ स्मारकांची निवड करण्यात आली.

त्यात पारोळा येथील भुईकोट किल्ल्याचा समावेश होता. या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृह व अल्पोपहार केंद्रासाठी ७८ लाख ८४ हजार ८१४ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून पारोळा भुईकोट किल्ल्यात जनसुविधा केंद्राचे बांधकाम किल्ल्याच्या आत मंजूर करण्यात आले आहे. या कामाला सुरुवातही झाली आहे.

मात्र, या कामाबाबत कोणताही फलक किंवा सूचना लावण्यात आलेली नाही. यापूर्वी काही सामाजिक संघटनांनी मिळून नगरपरिषद कार्यालय, बांधकाम विभाग, तहसीलदार व पोलिसांना निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांसाठी हे काम बंद करण्यात आले होते. मात्र, पुन्हा हे काम सुरू झाले आहे.

While inspecting the ongoing works in the fort area, P. G. Local residents including Patil, Deepak Ritual.
Jalgaon News: शेळगाव बॅरेजला वनविभागाची 11.59 एकर जमीन; नागपूर वनविभागाची मंजुरी

आताही या ठिकाणी कामाची माहिती देणारा कुठलाही फलक या ठिकाणी लावलेला आहे. या संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांच्याशी सुलभ जनसुविधा केंद्र निर्मिती संदर्भात चर्चा केली असता, थेट खासदारांमार्फत पुरातत्व विभागाच्या नाशिक कार्यालयातील अधिकारी आरती आळे यांच्याशी बोलणे झाले.

त्यावर त्यांनी सांगितले, की प्रवेशद्वाराजवळ सुरवातीला कॅन्टीन, त्यामागे वॉशबेसिन आणि त्याच्या मागे महिला व पुरुषांसाठी शौचालये राहणार आहेत. शिवप्रेमींनी सूचवलेली किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेश द्वाराजवळील जागा या आराखड्यास पुरेशी नाही. या ठिकाणी पुरातन वास्तूस धक्का लागेल. त्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले.

या कामाच्या चौकशीसाठी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक पी. जी. पाटील, पत्रकार भूपेंद्र मराठे, रमेशकुमार जैन, प्रतीक मराठे यांच्यासह ईश्वर ठाकूर, नीलेश मराठे, विजय चौधरी, मनोज चौधरी, अनिल भोई, दिनेश लोहार, अमित भावसार, गणेश पाटील, हर्षल भोई व नागरिकांनी पाहणी केली.

While inspecting the ongoing works in the fort area, P. G. Local residents including Patil, Deepak Ritual.
Jalgaon News: टोळी येथील ज्येष्ठांना आधारकाठी! वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्ताने राबवला अनोखा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()