Jalgaon News : फैजपूरच्या हद्दवाढ भागांचा विकास विरला हवेतच; अत्यावश्यक नागरी सुविधा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा

municipal council
municipal councilesakal
Updated on

Jalgaon News : शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागांच्या विकासकामांसाठी निधी मिळणे अवघड झाले असून, हद्दवाढ झाल्यानंतरही या भागांना विकासाची प्रतीक्षा चार वर्षांपासून कायम आहे.

सध्या पालिकेवर प्रशासक असले तरी अत्यावश्यक नागरी सुविधांचा विचार करून पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनदरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे.(not development of demarcated areas of Faizpur jalgaon news)

फैजपूर शहर यावल व रावेर तालुक्याच्या मध्यावर आहे. शहराचा औद्योगिक, शैक्षणिक, सहकार व राजकीय अशा सर्वच बाजूंनी विकास झाल्याने शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊन लोकसंख्येत कमालीची वाढ झाली.

अल्पकाळात शहराच्या चौफेर नवीन रहिवासी वस्त्या अस्तित्वात आल्या. पालिका हद्दीत असलेल्या जवळपास सर्वच रहिवासी वस्त्यांमध्ये मध्ये रस्ते, गटारी, पाणी अशा मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिकेने कोणतीच कसर सोडली नाही. शहर हद्दीत असलेल्या रहिवासी वस्त्या वगळता शहर हद्दीबाहेर असलेल्या रहिवासी वस्त्या शहर हद्दीत समाविष्ट होण्याची प्रतीक्षा अनेक वर्षांची होती.

फैजपूर शहराच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचनेचे शासनाचे राजपत्र पालिकेला ६ नोव्हेंबर २०१९ ला प्राप्त झाल्यानंतर शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागांचा विकास होणार, अशी उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली. त्या दृष्टीने पालिकेने हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी कंबर कसली होती.

त्याचबरोबर याविषयी रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत रावेर मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधताना रावेर व फैजपूर येथील हद्दवाढ झाली आहे. या भागांच्या विकासासाठी विकासकामे करण्यासाठी पाच ते दहा कोटी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. हद्दवाढ झाल्यानंतर मात्र कोरोनामुळे विकास निधी मिळणे अवघड झाले. अद्यापही निधीसाठी मिळत नाही.

municipal council
Jalgaon News : सावखेडा येथील जवान प्रवासादरम्यान बेपत्ता

दरम्यान, हद्दवाढ झाल्याने हद्दवाढ भागांमध्ये अत्यावश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे. त्या दृष्टीने पालिकेने हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये विकासकामांसाठी प्रयत्न सुरू केले. तसेच शहराची हद्दीत वाढ झाल्याने सदर भागाचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पालिकेतर्फे नाशिक येथील एजन्सीमार्फत आराखडा तयार करण्याचे सर्व्हेचे काम दोन वर्षांपूर्वी झाले.

त्या संदर्भात विकास आराखडा तयार करून विकास आराखडाचा इरादा जाहीर करून व डीपी प्लॅन तयार करून प्रथम शहराचे ड्रोनने सर्वेचे काम करण्यात आले. यानंतर स्ट्रेशल मशीनने सर्वे करून शहराच्या पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक भागातील शाळा, दवाखाने, ग्रीन झोन यासह मूलभूत सुविधांची माहिती संकलन केली गेली.

या विकास आराखडाच्या माध्यमातून डीपी प्लॅन तयार करून हद्दवाढ झालेल्या भागांत मूलभूत सुविधा म्हणून रस्ते, गटारी, इलेक्ट्रिक पोल, आदी कामे केली जाण्याची अपेक्षा होती. कोरोना काळानंतर पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे सूत्र प्रशासकांकडे असल्याची भर पडल्याने पालिकेला विकास कामांसाठी मिळणारा विकास निधी मिळणे अवघड झाले आहे.

त्यामुळे हद्दवाढ भागांच्या विकास कामांसाठी शासनाचा निधी उपलब्ध होईल असे सध्या तरी चिन्ह दिसत नाही. मात्र अत्यावश्यक नागरी सुविधांचा विचार करून येथील हद्दवाढ भागांचा विकासविकास होण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनदरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

municipal council
Jalgaon News : टॉवर चौकात वाहतूक विभागाला अपघाताची प्रतिक्षा? शहरवासीय संतप्त

''फैजपूर शहराच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून निधी मिळाल्यास वाढीव हद्दीत समाविष्ट क्षेत्राचा नियोजित विकास करणे सोयीचे होईल.''- ऐश्वर्या पिंगळे, रचना सहाय्यक, फैजपूर पालिका

municipal council
Jalgaon News : प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिर; विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमास सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()