जळगाव : रेल्वे हद्दीत गुरू चारणाऱ्या पशुपालकांविरोधात रेल्वे आरपीएफ व अभियांत्रिकी विभागाद्वारे कारवाईची मोहीम वर्षभर राबविली गेली.
या अभियानात एकूण ५ हजार ५५१ जणांना ताकीद देण्यात आली. ५३० पशुपालकांना नोटीस बजावण्यात आली, रेल्वेच्या जमिनीत गुरे चरणाऱ्यांवर रेल्वे कायद्यान्वये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले. (Notice to 530 cattle herders in railway limits RPF action 57 cases against herdsmen Jalgaon Crime)
गुरांचा (प्राणी) अपघात हा भारतीय रेल्वेचा प्रमुख चिंताजनक एक विषय आहे. गुरे रेल्वेखाली चिरडण्याच्या अपघातामुळे पशुपालकांचे नुकसान होते. रेल्वे मालमत्तेचे पण नुकसान होते आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात येते.
चालू वर्षात भुसावळ मंडलात एकूण ११२ सीआरओ (कटल रन ओव्हर) गुन्हे दाखल झाले आहेत. रेल्वेची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता, महाप्रबंधक/मध्य रेल यांनी १५ दिवस सघन अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार १५ ते २९ डिसेंबर कालावधीत भुसावळ विभागात धडक मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेदरम्यान, ज्या ठिकाणी गुरे रूळावर चिरडण्याची शक्यता आहे आणि ‘सीआरओ’ आदी कारणांचे विश्लेषण करण्यात आले.
विश्लेषणानंतर, भुसावळ विभागात सीआरओची एकूण ६४ संवेदनशील ठिकाणे ओळखण्यात आली आहेत.
सीआरओचे एक मुख्य कारण म्हणजे पॅन्ट्रीकार/ओबीएचएस कर्मचारी, रेल्वे यात्री आणि स्थानीय रहिवाशांकडून रेल्वे रुळांजवळ कचरा टाकणे. उपाय योजनांसाठी १० ठिकाणी सीमा/कुंपण बांधण्यात आले आहे. ५ ठिकाणी सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.
उर्वरित ठिकाणीही हद्दवाढीचे काम प्रस्तावित असून ते प्रगतिपथावर आहे. उक्त अभियान आरपीएफ/अभियांत्रिकी विभागाद्वारे संयुक्तपणे करण्यात आले.
या अभियानात एकूण ५ हजार ५५१ जणांना ताकीद देण्यात आली. ५३० पशुपालकांना नोटीस बजावण्यात आली. रेल्वेच्या जमिनीत गुरे चरणाऱ्यांवर रेल्वे कायद्यान्वये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
"रेल्वे ट्रॅकजवळ व रेल्वेच्या जमिनीवर कचरा, खाद्यपदार्थ टाकू नये. जेणे करून पशू रेल्वे लाइन जवळ येणार नाही. रेल्वेच्या जमिनीवर/रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला गुरे चरणे टाळावे जेणेकरून मोठे अपघात टाळता येतील." - इती पांडे, डीआरएम, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.