Jalgaon News : धरणगावच्या ‘त्या’ गुदाम मालकाला नोटीस

Notice News
Notice Newsesakal
Updated on

जळगाव : धरणगाव शहरानजीक असलेल्या गुदामात धान्याचा मोठा साठा आढळून आल्याप्रकरणी गुदाम मालकाला जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तसेच धान्याबाबत संबंधितांकडून खुलासाही मागविला आहे.

धरणगाव शहरानजीक चोपडा रस्त्यावरील गुदामाची ४ जानेवारीस जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानकपणे तपासणी केली. त्याठिकाणी दोन गुदामांमध्ये धान्याचा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी ही दोन्ही गुदामे सील करण्यात आली होती. (Notice to warehouse owner of Dharangaon Clarification sought by supply officials Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Notice News
Nashik News: ग्राहक न्याय आयोगाचा महावितरणला दणका! शेतकऱ्यास 6 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

तसेच धरणगाव तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आला होता. तहसीलदारांनी तातडीने पंचनामा करून जिल्हा पुरवठा विभागाला अहवाल सादर केला आहे.

या अहवालात श्रीराम ट्रेडर्सचे दिलीप मराठे यांच्या गुदामात ३९.५० क्विंटल तांदूळ, ७७.५० क्विंटल गहू, ११० क्विंटल खुला गहू, १३० क्विंटल (५० किलोप्रमाणे) तांदूळ, खुला तांदूळ ४० क्विंटल, असा एकूण ३९७ क्विंटल धान्य आढळून आले, तर तुळजाभवानी ट्रेडर्सच्या गुदामात ३९ क्विंटल तांदूळ, खुला तांदूळ ३०० क्विंटल, असे एकूण ३३९ क्विंटल धान्य आढळले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही दोन्ही गुदामे सील के होती.

अहवालानुसार बजावली नोटीस

गुदामात आढळून आलेल्या धान्याप्रकरणी तहसीलदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी गुदाममालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ११ जानेवारीस कागदपत्रांसह हजर राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, या सुनावणीनंतरच धान्याबाबतचा निर्णय होऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Notice News
Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()