Jalgaon News : पारोळा तालुक्यात आता पाचऐवजी सात महसुली मंडळे; शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात होणार फायदा

Jalgaon News : पारोळा तालुक्यात आता पाचऐवजी सात महसुली मंडळे; शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात होणार फायदा
Updated on

Jalgaon News : गेल्या अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयांतर्गत तालुक्यात पाच महसूल मंडळ होते. त्यामुळे आहे त्या परिस्थितीवर व तलाठ्यांकडून महसूल संदर्भातील कामे केली जात होती. मात्र आता तालुक्यात पाचऐवजी सात महसुली मंडळांची निर्मिती झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक शेतीशी निगडित असलेले प्रश्न गतीने सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पूर्वी तालुक्यातील महसूल मंडळे अनुक्रमे पारोळा, चोरवड, तामसवाडी, बहादरपूर व शेळावे अशी होती. सध्या स्थितीत तालुक्यातील तलाठ्यांची संख्या २७ असून महसूल खेडे ११४ आहेत. तर एकूण ४२ सजा आहेत. ( now 7 revenue circles in Parola taluka jalgaon news)

या ११४ खेड्यात पाच महसुलांचा कारभार पाच मंडळ अधिकारी अंतर्गत सुरू होता. मात्र आता पाचऐवजी सार्वे व बोळे ही दोन मंडळे वाढल्यामुळे तालुक्यात दोन मंडळाधिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तसेच तालुक्यातील विस्तारीकरण वाढल्यामुळे लवकरच पारोळा एक, पारोळा २ तसेच म्हसवे एक, म्हसवे यांचे विस्तारीकरण होणार असून, आगामी काळात तलाठी पदे भरल्यानंतर याबाबत अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालुक्यातील महसूल विभागाकडून शेतीशी संबंधित सर्व घटक याबाबत कामकाज सुरू असते. महसूल मंडळाची व्याप्ती वाढल्यामुळे कार्यक्षमता गतिमान होणार असून, प्रलंबित प्रश्न व शेतकऱ्यांच्या विविध अडचणी मंडळांच्या संख्येमुळे निश्चितपणे कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon News : पारोळा तालुक्यात आता पाचऐवजी सात महसुली मंडळे; शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात होणार फायदा
Jalgaon News : ‘बाबा मला शिक्षण घेऊ द्या...’ मुलींनी लिहिले पत्र; पालकांना भावनिक आवाहन

"तालुक्यात सुरुवातीस पाच मंडळे होती. आता दोन मंडळे वाढली आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल." -डॉ. उल्हास देवरे, तहसीलदार, पारोळा

"तालुक्यात सात महसूल मंडळे झाल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे याचा फायदा होईल. महसूल विभागाचे मनापासून अभिनंदन." - सुनील देवरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र शेतकरी संघटना

Jalgaon News : पारोळा तालुक्यात आता पाचऐवजी सात महसुली मंडळे; शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात होणार फायदा
Jalgaon Protest : पारोळ्यात सफाई कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन; ‘त्या’ आदेशाने आक्रमक पवित्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.