Jalgaon ZP School : पहिलीची पटसंख्या देतेय धोक्याची घंटा; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

school
schoolsakal
Updated on

Jalgaon ZP School : स्पर्धेच्या युगात आपली मुले टिकावीत, याचीच चिंता प्रत्येक पालकांना सतावत आहे. त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे भूत मानगुटीवर बसल्याने या शाळांकडे पालकांचा जास्त ओढा आहे.

परिणामी, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. काही वर्षांपूर्वी इयत्ता पहिलीच्या दोन किंवा तीन तुकड्या असायच्या. एका तुकडीत ३५ ते ४० विद्यार्थी संख्या होती. (number of students in Marathi school is extremely low jalgaon news)

आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी दोन अंकी संख्या गाठणे सुद्धा अशक्य झाले आहे. यात आसनखेडा, नांद्रा, कुरंगी, माहेजी येथील शाळांमध्ये दर दयनीय अवस्था आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांनी दर्जा सुधारण्याची गरज आहे.

आपल्या पाल्याने इंग्रजी शाळेतून शिक्षण घ्यावे, असा बहुतांश पालकांचा हट्ट असतो. त्यात अशिक्षित पालक व गोरगोरगरीब जनता याला अपवाद आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश सहज मिळवणे शक्य झाले आहे.

‘राईट टू एज्युकेशन’च्या (आरटीई) माध्यमातून इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के हुशार विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो, त्यात सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणानुसार प्रवेश मिळत असल्याने पालक वर्गाचा सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न असतो तर सधन पालक शाळांची फी भरुन आपल्या पाल्याला चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करून नर्सरीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात.

school
Jalgaon Municipality Election : नगरसेवकांची मुदत 17 सप्टेंबरला संपणार; प्रशासकीय राजवट लागण्याची शक्यता

अनेक नोकरदार व व्यावसायिक वर्ग तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास गेले असल्याचे चित्र आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत काही वर्षांपूर्वी पहिलीच्या दोन किंवा तीन तुकड्या असायच्या. एका तुकडीत ३५ ते ४० विद्यार्थीसंख्या होती. आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठीच्या प्रवेशासाठी दोन अंकी संख्या गाठणे सुद्धा अशक्य झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या बऱ्याचशा शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक व भौतिक सुविधा उपलब्ध नसतात. शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. शालेय पोषण आहार पुरवते. पहिलीपासून इंग्रजी शिक्षण आहे. परतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षणाची कमतरता असल्याची लोक भावना दूर होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

school
Ashadhi Ekadashi 2023 : मुक्ताईच्या गाभाऱ्याला खडसेंकडून खजुराची आरास; सव्वा क्विंटल खजूर अर्पण

असंख्य शाळांमध्ये संगणक, सुशोभीकरण, डिजिटल रुम, बेंच अशा असंख्य सुविधा उपलब्ध आहेत. व्यवस्थापन समितीच्या देखरेखीत कामकाज चालते, तरी सुद्धा पटसंख्या वाढत नाही. यातून असंख्य विद्यार्थी परत पाचवीपासून माध्यमिक शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळे माध्यमिक शाळांच्या पटसंख्येला कोणताही परिणाम होताना दिसत नाही. इंग्रजी माध्यमातून पाया पक्का होतो, असा गैरसमज दूर होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.

आसनखेड्यात पहिलीचे ७ विद्यार्थी

नांद्रा परिसरातील जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या चिंतनीय आहे. त्यात आसनखेड्यात ७, नांद्रा १५, कुरंगी ३८, माहेजी १०, अशी पटसंख्या आहे. काही दिवसांपूर्वी अनेक शाळांमध्ये ग्रेडेड मुख्याध्यापक नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु कमी पटसंख्येने यातील काहींचे पदही कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हिच स्थिती कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते.

school
Jalgaon RTO News : ‘आरटीओ’साठी नव्या आकृतिबंधास मान्यता; पद भरतीच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.