Jalgaon News : ‘पारस गोल्ड’मध्ये ग्राहकांनी साधला यावर्षीचा पहिला गुरुपुष्यामृत मुहूर्त

On the occasion of 'Gurupushyamrit', customers flocked to buy gold at Paras Gold Sarafa Pedhi.
On the occasion of 'Gurupushyamrit', customers flocked to buy gold at Paras Gold Sarafa Pedhi. esakal
Updated on

अमळनेर (जि.जळगाव) : यावर्षीचा गुरुवारी (ता. ३०) पहिल्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर ग्राहकांनी ‘पारस गोल्ड’मध्ये सुवर्ण लग्न बस्ताखरेदीला प्राधान्य दिले. सोने खरेदी हा भारतीय ग्राहकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. (occasion of first Gurupushyamrut customers prefer to buy gold wedding rings in Paras Gold jalgaon news)

त्यामुळे ग्राहकांना फायदेशीर ठरणारी सोने बुकिंग योजना ‘पारस गोल्ड’ने जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत सोन्याचा फक्त भाव ग्राहकाने बुक करावयाचा असून, प्रत्यक्ष दागिने खरेदीच्यावेळी भाव वाढला तर बुकिंगचाच भाव धरला जाईल. शिवाय बुकिंगच्या भावापेक्षा सोन्याचा भाव अजून, कमी झाला तर मात्र कमी झालेला भाव आकारला जाणार असल्याने येणाऱ्या लग्नसराईचा विचार करून ग्राहकांचा फायदाच फायदा होणार आहे.

गुरुपुष्यामृत हा महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असल्याने यादिवशी आवर्जून सोने खरेदी केली जाते. कारण हे सोने कायम टिकते आणि भरभराट होते, अशी भावना आहे. पारस गोल्डमध्ये पंचक्रोशीतील ग्राहक येत असल्यामुळे मुहूर्ताच्या वेढ्यांबरोबरच छोट्या दागिन्यांची लेटेस्ट व्हरायटीही उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

On the occasion of 'Gurupushyamrit', customers flocked to buy gold at Paras Gold Sarafa Pedhi.
Gulabrao Patil | बाजार समिती निवडणुका युतीतर्फेच लढणार : गुलाबराव पाटील

मंगळसूत्राचे माहेरघर अशी पारस गोल्डची ओळख आहे. त्यामुळे शॉर्ट गंठण, पेंडंट सेटला कायम मागणी असते, ते लक्षात घेऊन त्याची लेटेस्ट व्हरायटी असल्याने महिला ग्राहकवर्गाने खरेदीचा आनंद घेतला.

जोडीला महिलांसाठी हिरकणी (स्तनपान) कक्ष, लग्नबस्त्याच्या दागिन्यांवर मोफत इन्शुरन्स, कॅरेटोमीटरची सुविधा, ज्या शुद्धतेचे सोने त्या शुद्धतेचा भाव, २२ कॅरेट हॉलमार्क दागिने बदलून घेताना घट आकारली जात नाही, या सुविधांबरोबरच लग्नबस्त्याचे सोन्याचे दागिने खरेदीवर तितक्याच वजनाची चांदी पायल आणि जोडवीच्या स्वरूपात सप्रेम भेट ग्राहकांना मिळत असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

गुरुपुष्यामृत मुहूर्तासोबत वरील दोन्ही योजना अक्षय्य तृतीयेपर्यंत असल्याने ग्राहकांनी पेढीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन यावेळी पेढीचे संचालक विनोद थोरात आणि संदीप थोरात यांनी केले आहे.

On the occasion of 'Gurupushyamrit', customers flocked to buy gold at Paras Gold Sarafa Pedhi.
Market Committee Election : स्मिता वाघ, शिरीष चौधरी निवडणूक एकत्र लढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.