Jalgaon News : ग्रामीण भागातील तेलघाणी कालबाह्य; शेती उत्पादनातून करडई दिसेनाशी!

oil machine driven by bullock in rural areas Expired
oil machine driven by bullock in rural areas Expiredesakal
Updated on

Jalgaon News : ग्रामीण भागात बैलाला जुपूंन लाकडी तेलघाणी चालवली जात असत. परंतु बदलत्या काळानुसार विविध यंत्रसामग्रीचा शोध लागत गेल्याने बैलाला जुपूंन चालवल्या जाणाऱ्या तेलघाण्याचे रूपातर हे वीजमोटारीवर चालणाऱ्या घाण्यात रूपातर झाले. (oil machine driven by bullock in rural areas Expired jalgaon news)

ग्रामीण भागातील शेतकरी हे करडई व सुर्यफुलाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत असत. यामुळे तेलघाणी चांगल्या पद्धतीने चालवली जात. यामुळे व्यवसाय चालकांना चांगले दिवस होते तर नागरिकांना चांगल्या दर्जेदार पद्धतीचे तेल तसेच जनावरांसाठी पेंड उपलब्ध होत होती.

परंतु दिवसेंदिवस निसर्गचक्रात बदल होत चालले असताना वेळेवर पाऊस पडत नसल्यामुळे सुर्यफूल, करडई हे पीक शेतकऱ्याने घेणे बंद केले. यामुळे त्याचा परिणाम घाणा चालकांवर झाला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

oil machine driven by bullock in rural areas Expired
Shinde Vs Thackeray : नाव चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे मिशन इनकमिंग होणार सुरू....

या परिणामामुळे पुरेसे करडई व सुर्यफूल यांची आवक कमी झाली. त्यातच घाणाचालकांना या तेल विक्रीतून म्हणावा तसा नफा मिळेनासा झाल्यामुळे तेलघाणे बंद करावे लागले. ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच राहिल्यामुळे आजमितीला ग्रामीण भागातील तेलघाणी कालबाह्य झाली आसल्याचे पाहायास मिळत आहे.

पांझरापट्टयातून करडई गायब

एके काळी तापी पट्ट्यात कोरडवाहू जमिनीवर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर करडी पिकाची लागवड केली जात होती. परंतु बदलत्या वातावरणामुळे व पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करणेच बंद केले आहे.

oil machine driven by bullock in rural areas Expired
Jalgaon Bhusawal Railway : जळगाव-भुसावळ रेल्वेची चौथी लाइन सुरू; परिचालन विभागाची कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.