Jalgaon Crime News : वृद्धेच्या कानातील टॉप्स लांबविले

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon News : कापडी पिशवीत दोन लाख रूपये आहेत, असे सांगून दोन चोरट्यांनी भागीरथाबाई रामा बारी (वय ६५, रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा) यांच्या गळ्यातील पोत आणि कानातील टॉप्स काढून घेत पोबारा केल्याची घटना शनिवारी (ता. १०) गांधी मार्केट परिसरात घडली.

याप्रकरणी शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (old women earrings seized by thieves jalgaon crime news)

बारी यांचा मोठा मुलगा चौघुले प्लॉट येथे राहायला आहे. त्याला भेटण्यासाठी त्या शनिवारी सकाळी घरातून निघाल्या होत्या. सकाळी दहाच्या सुमारास त्या टॉवर चौकाकडून पायी जात असताना त्यांच्यासोबत एक महिला आणि पुरूषसुद्धा पायी चालत येत होते.

त्या महिलेने बारी यांना सांगितले की, आपण गांधी मार्केट येथे थोडावेळ बसूया. त्यानुसार एका दुकानासमोर तिघे बसले. त्यावेळी त्या महिलेने एक कापडी पिशवी बारी यांच्या हातात दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon News : विघ्नसंतोषींना पाठीशी घालू नका, सजग रहा : पोलीस निरीक्षक खताळ

त्यात दोन लाख रूपये आहेत, असे सांगून त्या महिलेसह पुरूषाने बारी यांच्या गळ्यातील ३६ हजार रूपये किंमतीची पोत आणि ६ हजार रूपये किंमतीचे कानातील टॉप्स काढून घेतले. नंतर दोघे तेथून निघून गेले.

पिशवीमध्ये काय आहे, म्हणून बारी यांनी जवळच असलेल्या फुल विक्रेत्या मुलाला पिशवी देवून ती उघडण्यास सांगितली.

पिशवी उघडताच त्यामध्ये कोऱ्या वह्यांचे फाटलेली पाने होती. वृद्ध महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Crime News
Water Wastage News : चाळीसगावात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; पालिका करणार कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()