Jalgaon Water Scarcity : चाळीसगाव तालुक्यात पाणीपातळीत दीड मीटरची घट; तीव्र टंचाईची चिन्हे

 water scarcity
water scarcitysakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस केवळ ८८.८ टक्के झाला आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळीत दीड मीटरने घट झाली आहे.

जळगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव तालुक्यांमधील पाणीपातळीत घट झाली आहे. यामुळे पाण्याचा कमी वापर आतापासूनच करण्याचे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे. (One and half meter drop in water level in Chalisgaon taluka jalgaon water scarcity news)

जिल्ह्यात जूनच्या सुरवातीला काही दिवस पावसाची कृपादृष्टी राहिली. त्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती. जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्यातही फार थोडे दिवस पर्जन्यमान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापी पट्ट्यात चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ८८.८ टक्के पाऊस झाला आहे.

सप्टेंबरनंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून जिल्ह्याची पाणीपातळी तपासली जाते. निरीक्षणासाठी काही विहिरी निश्चित करण्यात येतात. यंदाही अशी तपासणी नुकतीच करण्यात आली आहे.

नऊ तालुक्यांत पाणीपातळीत वाढ

जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, बोदवड, यावल, एरंडोल, जामनेर या सहा तालुक्यांमध्ये भूजलपातळीत वाढ झाली आहे.

 water scarcity
Raver Loksabha Election : अजितदादा गटाचा रावेर लोकसभेसाठी प्रयत्न : जिल्हाध्यक्ष संजय पवार

चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक टंचाई

जिल्ह्यातील इतर तालुक्यांची पाणीपातळी परिस्थिती समाधानकारक असली, तरी गिरणाकाठच्या चाळीसगाव तालुक्याने मात्र प्रशासनाची चिंता वाढविली आहे. चाळीसगाव तालुक्यातील भूजलपातळी १.५२ मीटरने घटली आहे.

पाणीपातळीतील घट अशी

तालुका - घट मीटरमध्ये

जळगाव - ०.२६

धरणगाव - ०.७५

चोपडा - ०.२१

अमळनेर - ०.७४

भडगाव - ०.१०

पाच तालुक्यांतील पाणीपातळीतील घट सर्वसाधारण दिसत असली तरी या तालुक्यांमध्ये पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

 water scarcity
Jalgaon News : आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करा अन्यथा... : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.