Jalgaon Accident News : कठड्याला कारची धडक; एक ठार

Overturned car while speeding.
Overturned car while speeding.esakal
Updated on

Jalgaon Accident News : भरधाव कारने पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ११) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली.( one died in car accident jalgaon news )

भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) हे विजया भगवान कोळी (वय ५५) आणि कुंतला भगवान कोळी (वय २४) यांना घेऊन कारने (एमएच १९, एएक्स ६४५३) वर अमळनेरहून धुळ्याकडे जात असताना जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनीच्या जवळ पुलाच्या कठड्याला भरधाव चारचाकी धडकल्याने चारचाकी पलटी होऊन भगवान सपकाळे जागीच ठार झाले.

विजया आणि कुंतला कोळी दोन्ही जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Overturned car while speeding.
Jalgaon Accident News : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

घटनेचे वृत्त कळताच सहायक निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिस कर्मचारी कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मृत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरले म्हणून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.

Overturned car while speeding.
Mumbai Accident News: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कारने सहा वाहनांना उडवलं! तीन ठार, सहा जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.