Jalgaon News: जळगावातील दीडशेवर मंदिरं होणार चकाचक! ‘आपली आस्था.. आपले मंदिर’ अभियानाचा प्रारंभ

आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या मार्गदर्शनाने शहरातील १५०हून अधिक मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे.
MLA Suresh alias Rajumama Bhole and activists during cleaning at Ichchadevi Chowk under 'Aapna Astha.. Aapna Mandir'.
MLA Suresh alias Rajumama Bhole and activists during cleaning at Ichchadevi Chowk under 'Aapna Astha.. Aapna Mandir'.esakal
Updated on

जळगाव : अयोध्येत प्रभू श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. त्यानिमित्त आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या मार्गदर्शनाने शहरातील १५०हून अधिक मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे.

त्याअंतर्गत शुक्रवारी सकाळी ‘आपली आस्था.. आपले मंदिर’अंतर्गत स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते या अभियानाचे शुभारंभ झाला. (One half hundred temples in Jalgaon will be glittering Launch of Apple Astha Aapna Mandir campaign Jalgaon News)

अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेबाबत जळगाव शहरात चैतन्य निर्माण झाले असून ‘आपली आस्था..आपले मंदिर’ या श्रमदानांतर्गत माता इच्छादेवी यांचे दर्शन घेऊन आरती करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

शहरातील धार्मिक स्थळांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण जळगावात भक्तीमय आणि राममय वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २२ जानेवारीस प्राणप्रतिष्ठा दिनी परिसरातील सर्व घराघरात श्री राम ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने अयोध्येत जय्यत तयारी सुरू असून सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही गरज भासल्यास राजूमामा संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असेही राजूमामा यावेळी म्हणाले.

MLA Suresh alias Rajumama Bhole and activists during cleaning at Ichchadevi Chowk under 'Aapna Astha.. Aapna Mandir'.
Jalgaon: कॉपीमुक्त अन भयमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करा; नाशिक विभागीय SSC बोर्ड सचिव मोहन देसले

या वेळी सुरेश भोळे व मित्र परिवार यांच्याबरोबर विनोद मराठे, दीपक बाविस्कर, लता वैराट, कोकिळा ढगे, रवींद्र जगताप, संपत कोळी यासह आदी उपस्थित होते.

अनेकांनी या श्रद्धेच्या ऐतिहासिक सोहळ्यात सक्रिय भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे. या 'आपली आस्था...आपले मंदिर' या श्रमदानांतर्गत स्वच्छता अभियान शृंखलेत शहरातील ५ मंदिर सजावट, प्रमुख ८ ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीनव्दारे अयोध्या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण, १० चौक सुशोभिकरण आणि शालेयस्तरावर श्रीरामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.

MLA Suresh alias Rajumama Bhole and activists during cleaning at Ichchadevi Chowk under 'Aapna Astha.. Aapna Mandir'.
Jalgaon Municipality News: शहरात खरेदीसाठी 4 चाकीने येताय! महापालिकेतर्फे आता गल्लोगल्ली पार्किंग सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()