Jalgaon News : येथील शेतकी संघावर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचीच पुन्हा सत्ता प्रस्थापित झाली आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या शेतकरी पॅनलचे पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांच्यासमोर तगडे आव्हान घेऊन उतरलेल्या पाचही अपक्षांचा निवडणुकीत धुव्वा उडाला.
शेतकी संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शेतकरी पॅनलचे दहा संचालक बिनविरोध निवडून आले होते. (one handed rule of NCP Congress Independents win in Chopra Shetki Sangh election Jalgaon News)
त्यामुळे पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. सर्वसाधारण व्यक्तीशः मतदारसंघात समाधान पाटील (घाडवेल) यांना १ हजार ३०२ मते, सुनील पाटील (आडगाव) यांना १ हजार २८७ मते व प्रशांत पाटील (पंचक) यांना १ हजार २५३ मते मिळाली. या तिघांचा या निवडणुकीत एकतर्फी विजय झाला.
इतर मागासवर्ग मतदारसंघाच्या जागेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान संचालक हितेंद्र देशमुख यांना अपक्ष उमेदवार विजय देशमुख यांनी तगडे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान निवडणुकीच्या निकालात दिसून आले नाही. हितेंद्र देशमुख यांना १ हजार १९२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी विजय देशमुख यांना केवळ ३७३ मते प्राप्त झाली.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात तीन उमेदवार रिंगणात होते. यात लीलाधर मुरलीधर कोळी (कोळंबा) हे १ हजार २९७ मते मिळवून विजयी झाले.
यापूर्वी सर्वसाधारण संस्था मतदारसंघात बाळकृष्ण पाटील (भार्डू), चंद्रशेखर पाटील (चोपडा), शामकांत पाटील (आडगाव), नारायण पाटील (लासूर), ज्ञानेश्वर पाटील (तावसे बुद्रूक), सचिन धनगर (अंबाडे), ललित बागूल (वेळोदे). महिला राखीव मतदारसंघात विजयाबाई पाटील (वढोदा) व राजकन्या पाटील (लासुर), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात देविदास धनगर (वडती) हे बिनविरोध निवडून आले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या निवडणुकीची मतमोजणी शहरातील कारगील चौकालगतच्या अग्रसेन भवनात सकाळी आठला सुरु झाली.
अकरा वाजता मतमोजणी संपली. सहायक निबंधक एस. एफ. गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटील (मंगरूळ) यांनी काम पाहिले.
मतमोजणीसाठी तालुक्यातील विविध सहकारी सोसायटींमधील सचिव आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.