Jalgaon News: कांदानं रोप लेतंस का रोप..! खानदेशात कांद्याचे शेत पडून; पावसाअभावी रोप विक्री होईना

No one is ready to buy onion plant due to lack of rain.
No one is ready to buy onion plant due to lack of rain.esakal
Updated on

Jalgaon News : देशात नाशिक जिल्हा, तर तर खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये विशेषतः श्रावणात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड अथवा पेरणी होते.

पावसाअभावी हजारावर एकर शेतजमिनी कांदालागवडीसाठी पडून आहेत. पावसाळ्याचे महत्त्वपूर्ण तीन महिने संपल्यात जमा असूनही मुबलक पाऊस पडलेला नाही.

कांद्याचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटले आहे. ज्यांनी कांद्याचे रोप वाढविले, ते रोप घ्यायला कोणी तयार नाही. ‘कांदानं रोप लेतंस का रोप..!’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Onion fields fall in Khandesh Plant sales will not happen due to lack of rain Jalgaon News)

खानदेशात जुलै आणि ऑगस्टमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. धुळे आणि साक्री तालुक्यात मोठे उत्पादन घेतले जाते. न्याहळोद, कापडणे, देवभाने, सरवड, नंदाणे, बुरझड, बोरीस, निकुंभे, लामकानी, दुसाणे, निजापूर, जैताणे हा कांदापट्टा म्हणून ओळखला जातो.

या भागासह जिल्ह्यात नदी-नाले वाहतील असा पाऊस झालेला नाही. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी घटत चालली आहे. याचा परिणाम बागायती पिकांवर झाला आहे. आहे त्या पाण्याने खरीप पिके वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

सत्तर टक्के कांद्याचे क्षेत्र घटले

धुळे जिल्ह्यात खरीप आणि लेट खरीप कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शेतकरी जूनमध्ये कांद्याचे बियाणे टाकतात. यापासून एक दीड महिन्यात रोप तयार होते. या वर्षी कांद्याला अधिक भाव राहील.

या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोपे तयार केली आहेत. पाऊस नाही. नदी-नाले कोरडे आहेत. तलाव, बंधारे, धरणे आणि प्रकल्पांमध्ये जेमतेम साठा आहे. अशा स्थितीत विहिरी व कूपनलिकांची पातळी कमालीची खालावली आहे.

कांद्यासाठी भरमसाट पाण्याची गरज असते. ती पूर्ण होऊ शकत नाही. पावसाची सुचिन्हे नाहीत. परिणामी कांद्याचे उत्पादन निघेल, याची शाश्वतीच नाही. कांदारोप फुकट घ्यायलाही कुणी तयार नाही, तर कांदा बियाण्याचे भावही कोसळले आहेत. सत्तर टक्के कांद्याचे क्षेत्र घटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

No one is ready to buy onion plant due to lack of rain.
Gulabrao Patil: संजय राऊत यांनी स्वतःचे कपडे सांभाळावेत : गुलाबराव पाटील

दृष्टिक्षेपात

-जिल्ह्याचे बागायती क्षेत्र १,८१३ हेक्टरहून अधिक

-जलसिंचन प्रकल्पांमुळे ५१,५९७ हेक्टर ओलिताखाली

-कांदालागवड क्षेत्र ६१३ हेक्टर/१५३२ एकर

पर्जन्यमान : ६०० मिलिमीटर/सरासरी

भाजीपाल्याचेही क्षेत्र घटले

जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादनही अधिक घेतले जाते. पाण्याची उपलब्धता घटली आहे. भाजीपाला क्षेत्रही कमी झाले आहे.

आता सरासरी दर प्रतिकिलो पन्नासपेक्षा अधिक गेला आहे. आगामी पितृपक्षात आवक मंदावणार असल्याने दर कडाडतील, असे भाजीपाला उत्पादक शेतकरी राजेंद्र माळी यांनी सांगितले.

No one is ready to buy onion plant due to lack of rain.
Uddhav Thackeray Group: पाचोरा येथे तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.