जळगाव : टास्क देवुन महिला डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक

cyber crime Fraud News
cyber crime Fraud Newsesakal
Updated on

जळगाव : खासगी रूग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरला (Doctor) नोकरी लावून देण्याच्या नावाखाली ६३ हजार ८२५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २५) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Online fraud of female doctor after giving task Jalgaon Cyber Crime News)

रावेर तालुक्यातील २३ वर्षीय महिला डॉक्टर जळगावात एका खासगी रुग्णालयात इंटर्नशिप करीत आहे. मंगळवारी (ता. २१) त्यांच्या वडीलांच्या मोबाईलवर हॉस्पिटलच्या नावाने एक मेसेज आला. हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला असावा म्हणून त्यांची आई यांनी हा मेसेज मुलीला पाठविला. होम बेस जॉब म्हणून मेसेज असल्याने या महिला डॉक्टरांनी २३ जून रोजी त्या मेसेजमधील क्रमांकाच्या व्हाटसॲपवर रिप्लाय मेसेज केला. त्यावर समोरील व्यक्तीने आम्ही तुम्हाला टास्क देऊ, ते तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमचे पैसे व कमिशन देऊ असे सांगून मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या वेबसाईडवर टास्क पूर्ण करायला सांगितला.

cyber crime Fraud News
Nashik : पॅरोलवरील ‘नॉट रिचेबल’ कैद्यांविरोधात गुन्हे

त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी टास्क पूर्ण केले. सुरवातीला त्यांच्या बँक खात्यातून १०० रुपये कपात झाले. त्यावर एक वस्तू घ्यायला सांगितली. ती घेतल्यानंतर पुन्हा २०० रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले असता महिला डॉक्टरच्या खात्यात ३८० रुपये जमा झाले. त्यानंतर पुन्हा एक हजार रुपये ट्रान्स्फर करायला सांगण्यात आले. असे वेळोवेळी सहा टास्क पूर्ण करायला लावले. त्यात ६३ हजार ८२५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. नंतर समोरील व्यक्तीने पैसेही परत केले नाही व कमिशनही दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टर यांनी शनिवारी जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.

cyber crime Fraud News
Nashik : बंडखोर आमदारांच्या निवास, कार्यालयांबाहेर पोलीस बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.