जळगाव : शहरातील जुने बसस्थानक परिसरात ‘रोलेट फन’ नावाचा ऑनलाइन सट्टा सुरू आहे. विशेष म्हणजे पूर्ण देशात बॅन असलेल्या सट्ट्याची पेढी जळगावमध्ये सुरू झाली आहे. या व्यावसायिकांचे टार्गेट शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव शहर पोलिस ठाण्यापासून अगदी जवळच जुने बसस्थानक परिसरात शर्मा पिता-पुत्रांनी रोलेट आणि फन गेम सुरू केला आहे. दोन्ही गेमचे व्यसन फार घातक आहे. सोबतच ‘दस का दम’ हा ऑनलाइन सट्ट्याचा गेमही सुरू केला आहे. लॉटरीच्या नावाखाली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुने बसस्थानकाला लागून हा सट्टा खेळला व खेळविला जात आहे. देशभर बंदी असलेल्या या सट्ट्यामुळे नाशिकमध्ये दोन कर्जबाजारी तरुणांनी आत्महत्या केली होती. नंतर जनप्रक्षोभ उसळून नाशिक पोलिसांनी त्यावर कारवाई करून कैलास शहासह त्याच्या साथीदारांना अटक केली होती.
पारंपरिक सटोड्यांपेक्षा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी या धंद्यासाठी खरे टर्गेट आहेत. चालता बोलता पैसा कमविण्याचे आमिष देत तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे. ‘दस का दम’ प्रकारात २० रुपयांच्या खेळावर लावलेल्या आकड्याचा नंबर आला, तर १०० रुपये मिळतात. ‘बिंगो फन’मध्ये बरोबर आलेल्या आकड्यााठी एक रुपयाला शंभर रुपये दिले जातात. प्रत्येक मिनिटाला निकाल येत असल्याने सटोड्यांची प्रचंड गर्दी जुने बसस्थानकाशेजारील दुकानांमध्ये होते. गेम खेळणाऱ्या ई-मेलप्रमाणे एक ऑनलाइन आयडी-पासवर्ड जनरेट करावा लागतो. त्याद्वारे रोख किंवा ऑनलाईन पैसा लावून जुगार खेळता येतो.
हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
केवळ कर्मचाऱ्यांची चलती
अवैध धंदेवाल्यांना परवानगी देणाऱ्या कलेक्शन मेंबर पोलिसदादा वगळता या धंद्याबाबत अद्याप तरी कुणाला माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, इतर धंद्यापेक्षा झटपट रिझल्ट व झटपट पैसा असल्याने हप्ताही दांडगा भरावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
डिस्ट्रिब्यूटरशीप जळगावकडे
रोलेट फन टार्गेट, दस का दम, बिंगो गेम्स या नावाने चालविल्या जाणाऱ्या सट्ट्याची जिल्ह्यातील डिस्ट्रिब्यूटरशीप जळगाव शहराला मिळाली असून, शर्मा पिता-पुत्र हा सट्टा संपूर्ण जिल्ह्यात बाजारपेठांच्या ठिकाणी पसरवत असल्याची माहिती माहितीगार धंदेवाल्यांकडून मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.