Jalgaon News : ई- पीक पाहणी केवळ 30 टक्के; ‘मोबाईल ॲप’च्या अकार्यक्षमतेमुळे हिरमोड

Talathi Nishikant Mane doing e-crop inspection with farmer Shankar Bagde on his mobile phone.
Talathi Nishikant Mane doing e-crop inspection with farmer Shankar Bagde on his mobile phone.esakal
Updated on

Jalgaon News : गेल्या तीन- चार वर्षांपासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महसूल आयुक्तांच्या देखरेखीखाली ‘मोबाईल ॲप’द्वारे जमिनीतील पिकांच्या स्थितीचा निर्णय घेतला जात आहे. ‘प्ले स्टोअर’वर जाऊन वर्जन टू ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार, सर्वत्र ई- पीक पाहणी मोहीम राबवली जात आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ‘ॲप’च्या अकार्यक्षमतेमुळे पारोळा तालुक्यात आजपर्यंत केवळ ३० टक्के ई- पीक पाहणी झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून याकडे पुणे येथील जमाबंदी आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (Only 30 percent e crop inspection has been done till date in Parola taluka jalgaon news)

जिल्ह्यासह तालुक्यात बहुतांश शेतकरी मोबाईल हाताळण्याच्या दृष्टीने अशिक्षित आहेत. त्यामुळे अनेकांना स्मार्टफोन हाताळणे जिकरीचे जाते. अगोदरच पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यात जमिनीची ई- पीक पाहणी वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. शेतीची ई- पीक पाहणी झाली नाही तर भविष्यात शासनाकडून

शेतीसाठी मिळणारे विविध अनुदान, पीक विमा, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत आदी विविध योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. या संदर्भात मंडळाधिकारी व तलाठी यांच्या कार्यालयात ई- पीक पाहणीबाबत शेतकरी वारंवार विचारणा करतात.

मात्र, ‘ॲप’च्या अकार्यक्षमता मुळे शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे? असा प्रश्‍न मंडळाधिकारी व तलाठींना पडला आहे. दरम्यान, ई- पीक पाहणीच्या हेल्प डेस्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्यानंतर त्याची दखलच घेतली जात नसल्याचा अनुभव जवळपास सर्वांनाच आलेला आहे.

वास्तविक, शासनाचे इतर विविध विभागांचे डिजीटल ॲप चांगल्या पद्धतीने काम करते. मात्र, शेतकऱ्यांच्या ई- पीक पाहणीच्या ॲप संदर्भातच नेहमीच सर्व्हर डाऊन का होते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Talathi Nishikant Mane doing e-crop inspection with farmer Shankar Bagde on his mobile phone.
Sakal Exclusive : वाळूमाफियांचे ‘नेटवर्क लय भारी’! वाळूचोरांचा महाराष्ट्रासह गुजरात सरकारलाही चुना

‘ई- पीक’साठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून ई- पीक पाहणीसाठी अखेरची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत दिली असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या पिकाची नोंद ई- पीक पाहणी ॲपद्वारे करावी, असे आवाहनही शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

मात्र, दिलेल्या मुदतीत ‘ॲप’च्या माध्यमातून ई- पीक पाहणी नोंद न झाल्यास, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हे ‘ॲप’ कुठलीही बाधा न येता, गतीमान कसे होईल, यादृष्टीने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांमधून होत आहे.

"पारोळा तालुक्यातच नव्हे संपूर्ण राज्यात संबंधित ‘ॲप’बाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने ई- पीक पाहणी नोंदणीसाठी मुदतवाढ दिलेली आहे. ज्यांची नोंदणी अद्याप बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी करून घ्यावी." - डॉ. उल्हास देवरे, तहसीलदार ः पारोळा

"महिन्यापासून माझा मुलगा शेतात पीक पेरा लावण्यासाठी शेतीच्या बांधावर जात आहे. मात्र, ई- पीक पाहणीचे संबंधित ॲप सुरु झाल्यानंतर खातेदाराचे नाव, संकेतांक कोड इथपर्यंतच सुरू होते. त्यानंतर यातील माहिती भरण्यासाठी ॲप्सच्या आतील इन्स्टॉलेशन केवळ गोल गोल फिरत राहते. त्यामुळे माझ्या शेतीची पीक पाणी अद्यापपर्यंत झालेली नाही. याबाबत संबंधित तलाठी व महसूल विभागाने लक्ष घालावे ही विनंती." - सखूबाई पाटील, शेतकरी ः म्हसवे शिवार (ता. पारोळा)

Talathi Nishikant Mane doing e-crop inspection with farmer Shankar Bagde on his mobile phone.
Jalgaon News : जिल्ह्यात अजूनही 67.73 टक्के शेतकऱ्यांचा पीकपेरा बाकी; ई-पीक पाहणीचे App या लिंकवरुन करा Download

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.