Jalgaon News : आठवडे बाजार परिसरात गांजाची खुलेआम विक्री

weekly Market Reference Image
weekly Market Reference Imageesakal
Updated on

एरंडोल (जि. जळगाव) : येथील आठवडे बाजार परिसर, पाताळनगरी परिसर या भागात गांजाची खुलेआम विक्री केली जात असून, पोलिसांनी याकडे त्वरित लक्ष घालून गांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Open sale of ganja in the weekly market area of erandol jalgaon news)

नगरपालिकेतर्फे अंजनी नदीच्या काठावर सुमारे चार कोटी रुपये खर्च करून सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक डिजिटल आठवडे बाजाराचे बांधकाम करण्यात आले आहे. या आठवडे बाजारातील गाळ्यांचे लिलाव झाले असले तरी अद्यापपर्यंत याठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू झालेला नाही.

सदर आठवडे बाजार परिसरात गांजा व भांग यासारख्या अमली पदार्थांची विक्री खुलेआम करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील युवक गांजा व भांग खरेदी करण्यासाठी येत असतात. यामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. गांजा व भांग विक्रेत्यांवर कोणाचाही धाक नसल्यामुळे ग्राहकांमध्ये कायम वाद होत असतात.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

weekly Market Reference Image
Jalgaon News : रेडीरेक्नरच्या दरात यंदा वाढ नाही; 2022 चे दर कायम राहणार

युवक गांजा व भांग यासारख्या अंमली पदार्थ्यांच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. याच परिसरात महादेवाचे मंदिर असून, याठिकाणी दररोज महिला व पुरुष दर्शनासाठी येत असतात. तसेच गांधीपुरा, कॉलेज, म्हसावद रस्त्यावरील नवीन वसाहती या भागात जाण्यासाठी नागरिकांकडून याच मार्गाचा वापर केला जात असतो.

पाताळनगरी परिसरातील एका गल्लीत देखील गांजाची विक्री केली जात असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या गांजा विक्रेत्यांकडे स्थानिक पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक पोलिसांनी गांजा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करून गांजा विक्री बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

weekly Market Reference Image
Jalgaon News : ओबीसींसाठी 9 वर्षे भाजपने काय केले? काँग्रेसचे जमील शेख यांचा सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.