Raver Loksabha Election : रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (शरद पवार गट) एकनाथ खडसे उमेदवार असतील तर आपला विजय निश्चित आहे.
त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढवावी किंवा त्यांच्याजागी सक्षम उमेदवार द्यावा असे मत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले. (opinion of office bearers about Raver Lok Sabha election contested by Khadse jalgaon news)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.१८) राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजीमंत्री अनिल देशमुख, माजीमंत्री एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघ आघाडीच्या माध्यमातून पक्षाकडून लढण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी आमदार एकनाथ खडसे या मतदार संघातून उमेदवार करीत असतील तर आपल्या पक्षाच्या विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. तर काही जणांनी जर एकनाथ खडसे लढत नसतील तर त्यांनी या ठिकाणी सक्षम उमेदवार द्यावा असे मत व्यक्त केले.
सध्याची परिस्थिती चांगली आहे. आता पक्षाला अनुकूल वातावरण आहे. पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळी जागा वाटपात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. पुढील आठवड्यातही मुंबईत पक्षाची बैठक होणार असून त्यावेळी जळगाव मतदार संघाची चर्चा करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.