Jalgaon News : ‘जातपडताळणी’ चा आदेश खंडपीठाकडून रद्दबातल; तत्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश

nagpur
nagpursakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा जात पडताळणी समितीला तातडीने वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश चेतना पाटील या विद्यार्थिनीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जातपडताळणी समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे या विद्यार्थिनीला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागणार होते.

जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे चेतना पाटील या विद्यार्थिनीने राजपूत भामटा जातीचा प्रस्ताव आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह सादर केला होता. यात जातप्रमाणपत्र देणे व त्याच्या पडताळणीचे विनियमन करिता अधिनियम २०००, नियम सप्टेंबर २०१२ मधील तरतुदीनुसार कागदपत्रे जोडली होती. (order of caste registration was quashed by bench jalgaon news)

प्रस्तुत कायद्यातील नियम व उच्च, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक न्यायसूत्राचे निर्देश निम्न न्यायिक अधिकार हे प्राप्त पडताळणी समितींना बंधनकारक आहेत. उच्च न्यायालयाने पडताळणी समितीचा निर्णय रद्दबातल ठरवून तत्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत.

अर्जदार चेतना निळकंठ पाटील विद्यार्थिनीचा जातीदावा जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून १४ सप्टेंबर २०२३ ला निर्णय पारित केला होता आणि त्याच दिवशी महाविद्यालयात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. १८ सप्टेंबरला समितीकडून आदेशाची प्रत मिळाली.

सुदैवाने वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास २० सप्टेंबरपर्यंत वाढीव मुदत मिळाली. त्यामुळे समितीच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्याची संधी मिळाली. न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे या न्यायपीठासमोर सुनावणीअंती याचिकर्त्याला तत्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत.

nagpur
Jalgaon Rain News : बोदवड, जामनेरला परतीच्या पावसाने झोडपले! बोरी, खडका नदीला पूर; सात्रीचा संपर्क तुटला

त्यानुसार पडताळणी समितीकडून त्याच दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला वैधताप्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे अभियांत्रिकी शाखेचा शैक्षणिक प्रवेश शाबूत राहून विद्यार्थिनीला दिलासा मिळाला. याप्रकरणी अॅड. आनंदसिंग बायस यांनी बाजू मांडली.

अभ्यासगटाचा यथार्थ पाठपुरावा

या निमित्त सामाजिक अभ्यासक तथा राजपूत भामटा/परदेशी भामटा समाज अभ्यासगट समितीचे कार्याध्यक्ष प्रा. सजनसिंह पवार यांनी आवाहन केले आहे, की जातीदावा प्रस्ताव सादर करताना विशेष काळजी घ्यावी.

प्रस्तुत कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक नोंदी, कागदोपत्री पुरावे, वडिलांकडील रक्तसंबंधित नात्यात वैधताप्रमाणपत्र उपलब्ध असल्यास नमुना क्रमांक तीनमध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे अचूक वंशावळ व हेच नातेसंबंध सिद्ध होणेकामी महसुली दस्तऐवज उदा. ७/१३ व ६ ‘ड’ हक्कपत्र किंवा घर मालकीचा उतारा, रेशनकार्डच्या नोंदी हे दस्तऐवज सोबत जोडावेत. थोडक्यात सादर केलेली वंशावळ शासकीय दप्तरातील अधिकृत नोंदीच्या नावावरून सिद्ध केली पाहिजे.

nagpur
Chandrakant Patil News : खडसेंकडून बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रत्यारोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.