Jalgaon News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहार- २०२२ मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानीबाबत पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. (Order to form Fruit Crop Insurance Grievance Redressal Committee jalgaon news)
या शेतकऱ्यांच्या तक्रारींचा तत्काळ निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राज्याच्या कृषी सचिवांना आदेश देण्यात आले असून, यासाठी मंगळवारीच खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व शोभा करंदलाजे यांची कृषी मंत्रालय, दिल्ली येथे भेट घेतली होती. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.
फळ पीकविमा योजना आंबिया बहार २०२२’मध्ये विमा उतरविलेला जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा आजपर्यंत पीकविम्याचा लाभ मिळालेला नसून, त्याबाबत अनेक समस्या आहे.
त्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे मागणी केली होती आणि आज त्याबाबत कार्यवाही होऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. या समितीकडे विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करून संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर समिती करून त्वरित समस्येचे निवारण करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार निवारण समिती गठन झाल्यावर संबधित शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी आपले अर्ज दाखल करण्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी फळ पीकविम्याच्या प्रलंबित लाभाबाबत समस्या असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.