Jalgaon News : नदीकाठच्या गावांतील वाहने तपासण्याचे ‘RTO’ला आदेश; अवैध वाळू प्रकरण पेटले

Order to RTO to check vehicles in riverside villages jalgaon news
Order to RTO to check vehicles in riverside villages jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा स्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकाची निर्मिती केली आहे.

वाळू उत्खनन बंद असल्याने वाळू वाहतुकीच्या मुख्य मार्गावर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, आरटीओने नदीकाठच्या सर्व गावातील विनाक्रमांकाच्या इतर वाहनांची तपासणी करून कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी (ता. २१) जिल्हा अवैध गौणखनिज सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. (Order to RTO to check vehicles in riverside villages jalgaon news)

जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, आरटीओ श्‍याम लोही, पोलिस अधीक्षकांचे प्रतिनिधी, महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, प्रांताधिकारी आदी उपस्थित होते.

अशा दिल्या सूचना

गिरणासह अनेक नद्याकाठच्या गावांत विनाक्रमांकाची वाहने आहेत. त्याची कसून तपासणी करा. वाहनात काही फेरफार केला आहे, की काय त्यांची वाहने तपासा, संबंधित मालकांवर कारवाई करा. काही वाहने कृषीविषयक वापरासाठी घेतली असून, त्याचा वापर वाळू वाहतुकीसाठी होत आहे का? याचीही तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिले.

तिघा यंत्रणांचे पथक

न्यायालयाने वाहन सोडण्याचे आदेश दिले असले, तरी आरटीओ विभागाने वाहनाची योग्य तपासणी करूनच वाहन सोडले पाहिजे. वाळू उत्खनन ठिकाणी होते, अशा ठिकाणासह वाहतुकीच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही लावा. जेणेकरून वाळू उपसा करून जाणारे वाहन पकडता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Order to RTO to check vehicles in riverside villages jalgaon news
Jalgaon News : गजानना तूच माझा मुलगा, तूच सांभाळ! आंबे वडगावच्या ‘त्या’ आजीची ‘डिस्चार्ज’प्रसंगी आर्त हाक

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सहा जणांचे (आरटीओ, महसूल, पोलिस) पथक तयार करून २४ तास ते कार्यरत ठेवण्याचे आदेशही दिले. सर्व आवश्यक उपाययोजना करून जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत.

असे असले तरी अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती सजग नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास अधिक परिणामकारक कारवाई करणे शक्य होईल. नागरिकांनी अधिकाधिक सहकार्य मिळवून अवैध गौणखनिजाचे साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती दिल्यास त्यांचे नावे गोपनीय ठेवले जाईल.

माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

नागरिकांना अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला ९२०९२८४०१० या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत व्हॉट्‌सॲपद्वारे घटनेचे छायाचित्र, चलचित्रफित (फोटो/व्हिडिओ), घटनेचे ठिकाण, गुगल लोकेशन कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Order to RTO to check vehicles in riverside villages jalgaon news
Engineering Diploma Admission : अभियांत्रिकी डिप्लोमाच्या प्रवेशाची या तारखेपर्यंत मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.