Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात शेतकरी अन् नागरिकांचा सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी काढल्या

7-12 Documents
7-12 Documents Sakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांच्या सात बारा उताऱ्यांवर अनेक कालबाह्य नोंदी अनेक वर्षांपासून होत्या. त्या काढण्यासाठी मागील वर्षात महसूल विभागाने विशेष मोहीमच राबविली.

त्यात एकूण ३२ हजार २५८ नोंदी शोधण्यात आल्या. त्यातील २६ हजार ८०० कालबाह्य नोंदी काढून त्या कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची खरेदी- विक्री करणे, कर्ज घेणे आदी प्रक्रिया सुलभ होणार आहे.

7-12 Documents
Jalgaon News : जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची होणार मोजणी; तपासणीसाठी ETS पथक दाखल

अनावश्‍यक नोंदी काढण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वी संबंधितांकडे अर्ज करावे लागत होते. बराच अवधी या नोंदी कमी करण्यासाठी लागून वेळेचा अपव्यय होत होता. आता सातबाऱ्यावरील अनावश्‍यक नोंदी कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेतीजमिनीचे व्यवहार तत्काळ करता येतील.

गाव नमुना नंबर सात बारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या कालबाह्य फेरफार नोंदी जसे, की तगाई बोजे, बंडिंग बोजे, सावकारांची नावे व बोजे, रद्द झालेल्या भूसंपादनाच्या नोंदी, आयटक बोजे, अस्तित्वात नसलेल्या संस्था अथवा सोसायटीचे बोज्याच्या नोंदी कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार महसूल विभागाने २०२२ मध्ये मोहीम राबविली.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

जळगाव जिल्ह्यात एकूण १२ लाख १७ हजार ५८८ एवढे सात बारा उतारे आहेत. त्यापैकी ३२ हजार ९७४ एवढ्या सात बारा उताऱ्यांवरील इतर अधिकारात तगाई, बंडिंग, सावकारी बोजे, नजरगहाण नोंदी शोधण्यात आल्या. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आतापर्यंत २६ हजार ८०० कालबाह्य नोंदी सात बारा उताऱ्यावरून कमी करण्यात आल्या.

राज्य स्तरावरील राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा घेण्यात आली होती. अभियानामुळे अधिकार अभिलेख बोजाविरहीत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामामुळे राज्यात दुसरा क्रमांक जळगाव जिल्ह्याला मिळाला होता.

''सातबारा उताऱ्यावर कालबाह्य नोंदी अनेक वर्षांपासून होत्या. शेतजमिनीचे व्यवहार करताना या नोंदीची पडताळणी करण्यासाठी कालावधी लागत होता. आता कालबाह्य नोंदी कमी झाल्याने शेतकऱ्यांना खरेदी, विक्रीचे व्यवहार सुलभरित्या करता येतील.'' - शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी, महसूल

7-12 Documents
Jalgaon News : महापालिकेने घरपट्टी भरण्याच्या दंडाची 'या' तारखेपर्यंत वाढविली

तालुकानिहाय कालबाहय नोंदी

तालुका--आढळलेल्या कालबाह्य नोंदी

जळगाव-- १५२४

भडगाव-- १६०८

पाचोरा-- २३६६

चाळीसगाव-- २१३४

पारोळा-- ११९४

एरंडोल-- ५४९१

7-12 Documents
Jalgaon News : गावठाणापासून 200 मीटर आतील जमिनीस बिनशेतीची गरज नाही : अमन मित्तल

धरणगाव-- ९४६२

अमळनेर-- १८२९

चोपडा-- १३८०

यावल-- १०१२

भुसावळ-- २९८

बोदवड-- २२९

जामनेर-- २३५६

मुक्ताईनगर-- ५७६

रावेर-- ७९९

एकूण-- ३२२५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.