Pachora Bazar Samiti : पाचोऱ्यात सभापतिपदासाठी हालचालींना वेग; राजकीय वर्तुळाचे लक्ष

pachora Market Committee Entrance
pachora Market Committee Entranceesakal
Updated on

Jalgaon News : पाचोरा- भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया सहकार निबंधकाच्या आदेशानुसार येत्या २२ मेस होत असून, त्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. (Pachora bazar samiti Chairman and Deputy Chairman selection process will be done 22 May jalgaon news)

पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी गेल्या २८ एप्रिलला ९८.२२ टक्के मतदान झाले होते. तर ३० एप्रिलला मतमोजणी प्रक्रिया पार पडली होती. त्यावर काहींनी आक्षेप घेतले ते आजतागायत कायम आहेत.

मतमोजणी अंती आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला ९ जागा, माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी व काँग्रेसचे प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ पॅनलला ७ व अमोल शिंदे आणि सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित शेतकरी सहकार पॅनलला २ जागा मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडी व भाजप एकत्र आले तरी त्यांचे बलाबल ९ होते. आमदार किशोर पाटील व भाजपाचे अमोल शिंदे यांच्यातील वैर व मतभेद कमालीचे विकोपाला गेले आहेत. त्यामुळे ते राजीखुशीने एकत्र येणे शक्य वाटत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

pachora Market Committee Entrance
Bank Recruitment : पाचोरा पीपल्समध्ये 5 महिन्यात नोकर भरती

परंतु राज्य स्तरावर भाजप शिवसेना युती असल्याने वरिष्ठ नेत्यांच्या दबावातून शिवसेना व भाजप एकत्र येतील व त्यांचे बलाबल ११ होईल अथवा भाजपचे दोघे संचालक तटस्थ राहिले तरी आमदार किशोर पाटील यांच्या ९ बलाबला आधारे ते आपली सत्ता प्रस्थापित करतील, असा अंदाज आहे. या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याने राजकीय वातावरण तापून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

चार आमदार किशोर पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले व बाजार समिती निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणारे गणेश पाटील यांचे नाव सभापतिपदासाठी अग्रस्थानी घेतले जात आहे. येत्या २२ मेस एन. के. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची विशेष बैठक बोलावण्यात आली असून, यात सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात तीन उमेदवारांकडून जिल्हा सहकार निबंधकांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचे वृत्त आहे.

pachora Market Committee Entrance
Sinnar Bazar Samiti : सभापतीपदासाठी हाय व्होल्टेज ड्रामा.. संचालक फोडाफोडीत कोणाला यश?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()