Jalgaon Accident News : बसची रिक्षास धडक; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

Accidental bus.
Accidental bus. esakal
Updated on

Jalgaon Accident News : धुळे येथून जळगाव येथे भरधाव जाणाऱ्या बसने प्याजो रिक्षास जोरदार धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.

तसेच रिक्षाचालक व अन्य एक प्रवासी देखील गंभीर जखमी झाला. या अपघातात दोन वर्षांचा मुलगा बचावला असून, सुदैवाने त्यास कोणतीही दुखापत झाली नाही. (Pajo rickshaw was hit by speeding bus jalgaon accident news)

हा अपघात मंगळवारी (ता. ११) रात्री साडेआठच्या सुमारास नवीन धारागीर गावाजवळ असलेल्या हॉटेल कृष्णासमोर झाला. शहरातील गांधीपुरा भागातील फारुख रमजान खाटिक हे पत्नी मुस्कानबी खाटिक व आपल्या दहा महिन्याच्या मुलीसह धुळे येथे नातेवाईकाकडे साखरपुड्यासाठी गेले होते.

साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते एरंडोल येथे येत असताना त्यांना एरंडोल बस न मिळाल्यामुळे खासगी वाहनाने पारोळा येथे आले. पारोळा येथून प्याजो रिक्षाने (क्रमांक एमएच १९, एएक्स ०२९१) एरंडोल येथे येत असताना नवीन धारागीर गावाजवळ असलेल्या हॉटेल कृष्णाजवळ त्यांच्या रिक्षास धुळे येथून भरधाव वेगाने येणाऱ्या धुळे-जळगाव बसने (क्रमांक एमएच २०, बीएल ३४५१) जोरदार धडक दिली.

या अपघातात फारुख रमजान खाटिक (रा. फखिरवाडा) व त्यांची पत्नी मुस्कानबी खाटिक तसेच रिक्षाचालक इकबाल बशीर खाटिक व रिक्षातील प्रवासी गणेश शांताराम महाजन गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accidental bus.
ST Bus Accident :भीमाशंकर हुन कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांची बस 20 फूट ओढ्यात कोसळली

अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थ व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी जाऊन गंभीर जखमींना बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी, डॉ. रोहित पुराणिक यांनी सर्व जखमींची तपासणी केल्यानंतर फारुख रमजान खाटिक यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. अपघाताची माहिती समजताच फारुख खाटिक यांचे नातेवाईक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी फारुख खाटिक, मुस्कानबी खाटिक व अन्य प्रवासी जखमी अवस्थेत पडले होते तर दहा महिन्यांचा फैजान हा रडत होता. अपघातानंतर बसचालक फरार झाला.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी बसचालक भरधाव वेगाने चालवत असल्याचे सांगितले. धुळे येथून साखरपुड्याचा कार्यक्रमास उपस्थित राहून घराकडे येत असताना घरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर अपघात होऊन फारुख खाटिक यांचा मृत्यू झाल्यामुळे फकिरवाडा परिसरात शोककळा पसरली. याबाबत हमीद चिंधा दैवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार विकास
देशमुख तपास करीत आहेत.

Accidental bus.
Jalgaon Accident News : ओव्हरटेकच्या नादात डंपरने दुचाकीस्वारास चिरडले; आकाशवाणी चौकातील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.