Jalgaon News : अवघ्या 3 तासात हरविलेल्या बालकाचा शोध; पारोळा पोलिसांची कामगिरी

Jalgaon News : अवघ्या 3 तासात हरविलेल्या बालकाचा शोध; पारोळा पोलिसांची कामगिरी
Updated on

Jalgaon News : पोटाची खळगी भागवण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी मध्य प्रदेश येथील रहिवाशी व सद्यस्थितीत बहादरपूर तालुका पारोळा येथे कामासाठी आलेले प्रेमसिंग पावरा हे आपली पत्नी मंगिता पावरा आपल्या दीड वर्षाच्या आरुष सोबत शेतात कामाला गेले होते.

मात्र तो झोक्यात दिसू न आल्याने पावरा परिवाराने त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने अखेर पारोळा पोलिसांच्या मदतीने तो अवघ्या तीन तासात सापडल्याने पावरा परिवाराने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करून आरुषला कवटाळले.

प्रेमसिंग पावरा व मंगिता पावरा हे शेतात काम करण्यासाठी जात असतात. घरी कोणी नसल्यामुळे अखेर ते दीड वर्षाचा मुलगा आरुष यालादेखील सोबत नेत होते. (Parola police search missing child in 3 hours jalgaon news)

दरम्यान ता. 7 ऑक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे ते शेतात जाऊन सकाळी अकरा वाजेच्या झोक्यात झोपलेला आरुष हा दिसेनासे झाला. त्यामुळे पावरा परिवाराने एकच हंबरडा फोडत मुलाचा शोध घेतला. मात्र तो सापडत नसल्यामुळे अखेर गावातील लोकांनी पारोळा पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर घटनेची माहिती पोलिसात दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बहादरपूर बीट परिसरातील हवालदार सुनील हटकर व अभिजीत पाटील यांना घटनास्थळी पाठविले.

यावेळी दोघेही पोलीस कर्मचारी व शिरसोदे गावातील महिला उज्वला अरुण कोळी, प्रमिला दिलीप भोई , भटू किशोर कोळी व भास्कर केशव भोई यांनी परिसरात आरुषला शोधण्याचा प्रयत्न केला असता पिंपळ भैरव शिवारातील रस्ता लगत सदर मुलगा दिसून आला.

यावेळी पोलिसांनी आरुषला वडील प्रेमसिंग पावरा व आई मंगिता पावरा यांचे स्वाधीन केले. यावेळी पावरा परिवाराने अखेर सुटकेचा निःश्वास सोडत आरुषला कड्यावर घेत कवटाळून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Jalgaon News : अवघ्या 3 तासात हरविलेल्या बालकाचा शोध; पारोळा पोलिसांची कामगिरी
Jalgaon Crime: चिथावणीखोर घोषणा दिल्याप्रकरणी 39 जणांवर गुन्हा; जुलूसमधील घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई

शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घ्यावी

सध्या कापूस वेचणी सह शेतातील इतर कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतातील काम करीत असताना आपल्या सोबत असलेली लहान बालके यांची काळजी घेत होणारे गैरप्रकार कमी करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहेत. तसेच सणासुदीचे दिवस असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे यासाठी तालुक्यातील नागरिकांनी दक्ष राहून गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक

दरम्यान अवघ्या दीड वर्षाच्या आयुष हा झोक्यातून अचानकपणे बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळतात बहारपुर बीट हद्दीतील हवालदार सुनील हटकर व अभिजीत पाटील यांनी गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने आयुष चा शोध घेत त्यांच्या मुलगा पावरा कुटूंबियांच्या स्वाधीन केला. त्यामुळे या दोघेही पोलीस कर्मचारी व त्यांना मदत करणारे गावातील महिला व पुरुषांचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी कौतुक केले.

Jalgaon News : अवघ्या 3 तासात हरविलेल्या बालकाचा शोध; पारोळा पोलिसांची कामगिरी
Jalgaon Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना ग्रंथपालास अटक; करगाव आश्रमशाळेतील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()