Parola Vikas Parva : राजकारणात आबादानी मात्र औद्योगीकरणापासून उपेक्षित!

parola
parolaesakal
Updated on

"महामार्गावर वसलेला पारोळा तालुका राजकारणाची परिपक्व (Mature) पाठशाळा म्हणून जिल्ह्यात अग्रेसर आहे. बोरी प्रकल्पासह इतर लघु प्रकल्पांमुळे टंचाईतही सावरण्याची क्षमता तालुक्यात आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक आदी क्षेत्रांत तालुक्याने मिळविलेला लौकिक इतरांवर छाप पाडणारा आहे. कोरोनामुळे तालुक्यातील व्यापार व उद्योगधंद्यांची वाताहत झाली. (parola vikas parva article about Abadani in politics but marginalized from industrialization jalgaon)

आलबेल असलेल्या वातावरणात कोरोनाने केलेला प्रवेश शहराच्या प्रगतीला खीळ बसविणारा ठरला. राजकारणात आबादानी मात्र औद्योगीकरणापासून उपेक्षित पारोळा तालुक्यास सर्वांनी आत्मनिर्भर होऊन एकजुटीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ऐतिहासिक अध्यात्माचा वारसा असलेला पारोळा तालुक्याला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी सर्वपक्षीयांचा आधार महत्त्वपूर्ण ठरणार आहे." -संजय पाटील, पारोळा

जळगाव ते धुळे या जिल्ह्यांना जोडणारा पारोळा तालुका. राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा तालुका आजही इतिहासाची साक्ष देत आहे. एकेकाळी पाण्यासाठी भटकंती करावी लागणारा तालुका म्हणून ओळख होती.

मात्र (कै.) आमदार आप्पासाहेब भास्करराव पाटील यांनी बोरी प्रकल्पासह इतर लघु प्रकल्प निर्माण करून तालुक्यात पाण्याची आबादानी आणली. अनेकवेळा तालुक्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना केला. मात्र, खडतर प्रवासातून सहीसलामत बाहेर निघत तालुका प्रगतीकडे आगेकूच करीत आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

parola
KYC Fraud : KYC करण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक

ग्रामदैवत श्री बालाजी महाराज व पुरातन झपाटभवानी मंदिराचा धार्मिक वारसा लाभलेल्या शहरातील शासकीय क्रीडासंकुल, महामार्ग चौपदरीकरण, भुईकोट किल्ला व इतर प्रश्न अर्ध्यावर रेंगाळली आहेत. शासनाची उदासीनता व लोकप्रतिनिधींचा अपूर्ण पडत असलेला पाठपुरावा, हे प्रमुख कारण आहे. याबाबत सर्वपक्षीय राजकारणी नेत्यांनी एकजुटीतून मार्ग काढणे गरजेचे आहे.

तालुक्यात अनेक अष्टपैलू कारागीर व कलाकुसर आहे. गरज आहे त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची, शहरात कापड व्यवसाय, महेश मॉल व सावित्री फायर वर्कसमध्ये बेरोजगारांना रोजगार मिळाला.

मात्र, तालुक्यात कोणतेच मोठे औद्योगिक केंद्र नसल्याने बरेच शिक्षित तरुण उदरनिर्वाहासाठी आहे त्या कामात गुंतले आहेत. राजकारणातून समाजकारण हे सूत्र तालुक्याने जोपासले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यात उद्योगास गती देण्यासाठी सर्वांचा पुढाकार तितकाच आत्मबळ देणारा आहे.

रोजगारच्या संधीचा अभाव

तालुक्यात भाजीपाला विक्री, कापड, किराणा दुकान, हॉटेलवर मजुरी, बाजारपेठलगत हमाली आदी कामे सोडली, तर व्यवसायाची संधी नसल्याने शिक्षित तरुण उच्च शिक्षणाचा बाहू न करता मिळेल ते काम करीत आहेत.

parola
Jalgaon News : उभ्या दुचाकीवर दुचाकीस्वार धडकला; गणपतीनगरातील गृहस्थ गंभीर

त्यामुळे तालुक्यात मोठा उद्योग उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेती करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी शेतकरी व तरुणांसाठी लोकहिताच्या योजना आणल्या, तर निश्चितच तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे.

कोरोनामुळे व्यापारी महासंघाचा उदय

कोरोना लॉकडाउनमुळे बाजारपेठ कन्टेंटमेंट झोनमुळे बंद होती. या काळात आपल्या मागण्यांची दखल घेतली जावी, प्रशासनाकडून न्याय मिळावा, यासाठी व्यापारी महासंघाची स्थापना झाली. सर्वच छोटे- मोठे व्यापारी एकत्र आले. यातून समस्यांचे निराकरण करण्याची भूमिका घेतली.

कोरोनाकाळात प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान व्हावा, यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, उपाध्यक्ष अशोक लालवाणी व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे डॉक्टर, महसूल, पालिका, पोलिस, माध्यम प्रतिनिधींसह सर्वच घटकांतील लोकांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान केला. व्यापारी महासंघाने ग्रामीण रुग्णालयास यथोचित योगदान देऊन आदर्श निर्माण केला. यामुळे नवा पायंडा शहरात पडला.

parola
Jalgaon News : सुसाट कारची वृद्धाला धडक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.