Parola Vikas Parva |ऐतिहासिक अन् अध्यात्माची पंढरी : पारोळा तालुका

nageshwar mahadev mandir
nageshwar mahadev mandiresakal
Updated on

"ऐतिहासिक आणि अध्यात्माची पंढरी म्हणून पारोळा तालुक्याने लौकिक मिळविला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वसलेले पारोळा बालाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत, तर झाशीच्या राणीचे माहेरघर म्हणून ओळख आहे.

पुरातन झपाटभवानी मंदिर, अतिजागृत श्री सत्यनारायण मंदिर, धार्मिक व ऐतिहासिक वारसा साथीला घेत तालुक्याने विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे." -संजय पाटील, पारोळा (parola vikas parva Historical and Spiritual Pandhari Parola Taluka jalgaon)

झपाटभवानी मंदिर.
झपाटभवानी मंदिर.esakal

सुमारे लाखावर लोकसंख्या व ११४ गावांचा सरळ सपाट पठावर असलेला पारोळा तालुका. त्यात ऐतिहासिक पावननगरी म्हणून ओळखले जाणारे शहर. सुवर्णालंकार जडणघडण करीत अग्रेसर, तर तिवसच्या बैलगाड्या बनविण्यात माहीर असलेले शहर.

वाढत्या संशोधनाबरोबर यंत्रयुग येऊन पारोळानगरीत अनेक स्थित्यंतरे आली. काळाच्या ओघात पारोळा शहर मागे पडले असून, विकासाच्या ध्यास घेऊन अनेक दशकांपासून विकसित होण्यासाठी वाट पाहणारे शहर आहे.

पारोळी ते पारोळा

चारशे वर्षांपूर्वी वडांचा पारंब्यांनी वेढलेल्या नगराची रचना पिंगळे घराण्याने केली असल्याचे सांगण्यात येते. पितळी भांड्यांचे येथे अनेक कारखाने होते. माहीर कारागीर होते म्हणून या नगरात सुरवातीस पारोळी नाव होते.

कालांतराने पारोळीचे नाव पारोळा नाम विधान झाले. आठ दरवाजांचे तटबंदी असलेल्या शहरात भग्नावस्थेतील किल्ला असून, त्या काळात येथे वतनदारीचे कार्यालय होते. नगरीचे वहिवाटदार म्हणून तांबे घराणे होते. त्यांचे वारस माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश तांबे वास्तव्यास आहेत.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

nageshwar mahadev mandir
Parola Vikas Parva : राजकारणात आबादानी मात्र औद्योगीकरणापासून उपेक्षित!

धार्मिक वारसा

पारोळा धार्मिक शहर आहे. झपाटभवानी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, मोठा महादेव मंदिर, बाजारपेठेतील मोठे हनुमान मंदिर, जुलूमपुऱ्यातील छोटे राम मंदिर, मोठे श्रीराम मंदिर, धरणगाव रस्त्यावरील उजेड खेळ मारोती, श्री बालाजी मंदिर नगरवासीयांचा धार्मिक भावनांचा वारसा दाखवितात.

श्री बालाजी मंदिर

सुमारे ३७५ वर्षांपूर्वी आपल्या भक्तांच्या भावनांची कदर करून श्री बालाजी तिरुपतीहून श्री भक्त शिरोमणी गिरीशशेठ यांच्या झोळीमध्ये येथे आल्याची हकिगत आहे. नवसाला पावणारा, असे जागृत स्थान आहे. येथील नवरात्रीत वहन, रथोत्सव विलक्षण प्रेक्षणीय आहे. येथील रथ भारतात दोन नंबरवर असावा, असा सुरेख आहे.

तालुक्यातील नागेश्वर मंदिर पूर्वी राजाश्रीत होते, तर श्री सत्यनारायण मंदिरातील मूर्ती भक्तांना संतुष्ट करीत आहे. म्हसवे येथील जंजनीदेवी मंदिर, तेथील झुलते मनोरे, तलाव इतिहासाची आठवण करून देत आहेत. अतिजागृत कुबेरनाथ शक्तिपीठ म्हणून बहादरपूर येथे श्रीक्षेत्र शिवशक्तीचे धार्मिक अधिष्ठान आहे.

धार्मिक वारसाची साक्ष देणारे ग्रामदैवत बालाजी मंदिर.
धार्मिक वारसाची साक्ष देणारे ग्रामदैवत बालाजी मंदिर.esakal
nageshwar mahadev mandir
Adani Crisis : जळगावात 150 कोटींचा फटका; गुंतवणूकदारांचे वेट ॲन्ड वॉच!

भारतातील दुसरे बद्रिनाथ मंदिर बहादरपुरात

बहादरपूर (ता. पारोळा) येथे भारतातील दुसरे बद्रिनाथ मंदिर पारोळा तालुक्याच्या ख्यातीत भर घालते. १९१९ ते १९२० च्या काळात बहादरपूर येथील (कै.) श्रीमंत रामलाल काळूराम मिश्र सपत्नीक हिमालयातील श्री बद्रिनाथ यात्रेस गेले. मात्र, तेथील मंदिरात त्यांना प्रवेश नाकारल्याने मिश्र दांपत्य धर्मशाळेत परतले. कालांतराने श्री बद्रिनाथ त्यांच्यासमोर प्रकटले.

बहादरपूर गावात श्री बद्रिनाथ मंदिराची उभारणी करून तेथेच माझे दर्शन घेण्याचे त्यांनी सांगितले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर बहादरपूरला मंदिराची उभारणी करण्यात आली. श्री बद्रिनारायण मंदिरास पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त आहे. दर वर्षी शासनाकडून येणाऱ्या निधीतून मंदिराचा विकास होतो.

देवस्थानाचा कार्यभार नारायण रामलाल मिश्र यांच्या अध्यक्षेखाली विश्वस्त मंडळ करीत आहेत. येथे अतिजागृत श्रीक्षेत्र शिवशक्ती शक्तिपीठ आहे. आचार्य के. बी. रणधीर पीठाच्या माध्यमातून जलस्रोत व व्यसनमुक्तीचे कार्य करतात.

nageshwar mahadev mandir
Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

कर्मवीरांची भूमी

महान लेखक कादंबरीकार (कै.) ह. ना. आपटे यांचे पारोळा आजोळ होते. बहादरपूर येथे बा. सी मर्ढेकर यांनी शिक्षण घेतले होते. (कै.) श्रीनिवासभाऊ अग्रवाल यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते शहरात होऊन गेलेत.

१९७२ च्या दुष्काळात आपली भंडार उघडी करून दिल्यामुळे आज पारोळा शहर टिकून आहे. वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक दोधूभाई परदेशी, निःस्पृह राजारामबापू भावसार आजही राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय सेवेचा संदेश देत आहेत.

कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध

कापसाची बाजारपेठ म्हणून शहर प्रसिद्ध होते. त्यामुळे शहराचा राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशशी थेट संबंध यायचा. जिनिंग मिलमधून कापसाच्या गाठी बाहेरगावी जात होत्या. वस्त्रोद्योगात भरभराटीस असलेले शहर पॉवरलूमच्या चक्रात भरडले गेले. आज हातमागाचे काही अवशेष येथे शिल्लक आहेत.

nageshwar mahadev mandir
BHR Scam Update : संचालक, अवसायक, कर्जदार आता खंडणीचा गुन्हा; गुन्ह्यांची मालिका सुरूच

लाकडी बैलगाडी येथून पैठण, नगरपर्यंत प्रसिद्ध होती. आज हा व्यवसाय कालबाह्य होण्याचा मार्गावर आहे. सुवर्णालंकार कलाकुसरीत येथील कारागीर माहीर असून, दूरवरून येथे सुवर्ण ठसे बनविण्यासाठी येतात. रौप्य मुकुट बनविण्यात येथील टोळकर घराणे अग्रेसर आहे.

तालुक्याला वरदान बोरी धरण

पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण भटकावे लागत होते. पूर्वी विहीर किंवा आडाचे पाणी पिऊन लोक गुजराण करायचे. त्याकाळी पाणी नसल्यामुळे बाहेरची मंडळी या गावी आपली मुलगी देण्यास नकार देत.

मात्र, या परिस्थितीला कलाटणी देऊन (कै.) आमदार भास्कररावआप्पा पाटील यांनी तामसवाडीत बोरी धरण बांधले. हे धरण तालुक्यासह शहरासाठी वरदान ठरले आहे. एवढेच नव्हे, तर या धरणाचा धुळे जिल्ह्यालाही फायदा होतो.

nageshwar mahadev mandir
Jalgaon News : सुसाट कारची वृद्धाला धडक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.