Jalgaon : ‘पार्टटाइम जॉब’ च्या आमिषातून फसवणूक

cyber crime relaed with job
cyber crime relaed with jobesakal
Updated on

जळगाव : ऑनलाइन जॉब प्लेसमेंटद्वारे पार्टटाइम जॉब देण्याचेआमिष दाखवून सायबर चोरट्याने जळगाव शहरातील गायत्रीनगरातील तरुणाची दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.

शहरातील गायत्रीनगरातील रहिवासी प्रमोद दिनकर इंगळे (वय २९) एका कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरीला आहेत. ३ सप्टेंबरला त्यांना पार्टटाइम जॉबसंदर्भात एक लिंक आली. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने पार्टटाइम जॉब मिळवून देतो, असे आमिष दाखवीत इंगळे यांना पैसे जमा करायला सांगितले.(part time online job fraud of young boy jalgaon cyber crime news)

cyber crime relaed with job
Shardiya Navratri 2022 : नवसाला पावणारी कुलस्वामिनी म्हाळसा देवी

त्यानुसार इंगळेंनी संबंधित अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या वेगवेगळ्या लिंकवर टप्प्याटप्प्याने एकूण दोन लाख तीन हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविले. जॉबही मिळाला नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत म्हणून संबंधितांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तब्बल २६ दिवसांनंतर गुरुवारी इंगळे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.

cyber crime relaed with job
Kirankumar Bakale Controversial statement Case: अटकेच्या मागणीसाठी आज मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.