Jalgaon News : पाटचारीचे पाणी शेतात शिरले; पिकांचे नुकसान

Dokalkheda (T.Pachora): The water of Patchari entered the field of Yogesh Patil in Shivara
Dokalkheda (T.Pachora): The water of Patchari entered the field of Yogesh Patil in Shivaraesakal
Updated on

पाचोरा : बिल्दी (ता. पाचोरा) शिवारात असलेल्या बहुळा मध्यम प्रकल्पाचे पाणी मुख्य व पोट पाटचारीत सोडल्याने पाटचाऱ्यांमधून पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने शेतात पाणी शिरून तीन एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी योगेश पाटील यांनी या प्रकरणी चौकशी, कारवाई व भरपाईची मागणी केली आहे.

बहुळा मध्यम प्रकल्पाचे पाणी गेल्या आठवड्यात मुख्य पाटचारी व पोटचारीतून सोडण्यात आले. तेरा वर्षांपासून या पाटचाऱ्यांमधून पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे पाटचाऱ्यांमध्ये प्रचंड झाडेझुडपे व घाण साचली आहे. (Patchari water entered fields Damage to crops Farmers demand for compensation after enquiry jalgaon news)

Dokalkheda (T.Pachora): The water of Patchari entered the field of Yogesh Patil in Shivara
Nashik News : नववर्ष स्वागतावेळी कायदा पाळा

अनेक ठिकाणी पाटचाऱ्या बंद आहेत, असे असताना संबंधित पाटचारी क्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बहुळा प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाटचाऱ्यांमधून पाणी सोडले. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने डोकलखेडा (ता पाचोरा) येथील शेतकरी योगेश पाटील यांच्या शेतात पाणी शिरले व सुमारे तीन एकर क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. पुढील महिन्यावर हे पाणी शेतात थांबणार असल्याने शेतकरी योगेश पाटील हवालदिल झाले आहेत.

या संदर्भात शेतकऱ्यांना व संबंधित ग्रामपंचायतींना सुचित केले होते, असे बहुळा प्रकल्पाच्या अधिकारी व अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी मात्र त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून शेतकरी व ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Dokalkheda (T.Pachora): The water of Patchari entered the field of Yogesh Patil in Shivara
Jalgaon Crime News : वृद्धाचे हातपाय बांधून साडेसहा लाखांची लूट

पाटचाऱ्यांमधील झाडेझुडपे घाण यांची साफसफाई करून नंतर पाणी सोडले असते तर पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना फायदा झाला असता परंतु संबंधित अधिकारी व अभियंतांच्या बेफिकीर वृत्तीमुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी तर पोहोचले नाहीच उलट बंद पडलेल्या पाटचाऱ्यांमुळे शेतांमध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी योगेश पाटील यांनी केली आहे.

Dokalkheda (T.Pachora): The water of Patchari entered the field of Yogesh Patil in Shivara
Nashik News: धोकादायक रामसेतूची होणार केवळ डागडुजी; स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात मिळाले जीवदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.