Patil Khadse controversy : माफी मागायला तयार, पण नाथाभाऊंनी चहाला यावे..!

khadse gulabrao patil
khadse gulabrao patilesakal
Updated on

Jalgaon News : पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणासंबंधी अब्रुनुकसानीचा दावा आहे. त्यात विशेष काही नाही. नाथाभाऊ वयाने मोठे आहेत.

अनेकदा त्यांना नमस्कार केला आहे. आपण माफी मागावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी चहाला यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना केले.

फडणवीस सरकारमध्ये खडसे मंत्री असताना, गुलाबराव पाटील यांनी २०१६ मध्ये त्यांच्यावर आरोप केल्यानंतर खडसे यांनी जिल्हा न्यायालयात पाटलांवर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.(Patil Khadse controversy Be prepared to apologize through Nathabhau should come for tea Guardian Minister appeals on defamation claim Jalgaon News)

नंतर हा दावा रद्द करण्यात आला. खडसेंनी उच्च न्यायालयात अपील केल्यावर खंडपीठाने तो खालच्या न्यायालयात चालविण्याबाबत निर्देश दिले. त्यावर नुकतीच सुनावणी सुरू झाल्यानंतर खडसेंनी या प्रकरणात भाष्य करत गुलाबरावांनी माफी मागितली, तर मार्ग निघेल, असे संकेत दिले होते.

त्यावर गुरुवारी (ता. २२) माध्यमांनी गुलाबराव पाटलांचा विचारले असता, ते म्हणाले, की पाच- सहा वर्षे जुना हा खटला आहे. तो जिल्हा न्यायालयाने फेटाळला. श्री. खडसे खंडपीठात गेल्यानंतर हा दावा पुन्हा सुरू झाला.

नाथाभाऊ ज्येष्ठ आहेत. त्यांची आपण माफी मागावी, अशी अपेक्षा असेल, तर तो ‘इगो’चा विषय आहे. आपण अनेकदा त्यांना नमस्कार केला आहे. त्यामुळे आताही माफी मागायला तयार आहोत, पण त्यांनी त्यासाठी चहाला यावे, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

khadse gulabrao patil
Jalgaon Municipal Corporation : शंभर कोटींतील कामाना ना-हरकत देऊ नये; महापौरांचे आयुक्तांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.