Jalgaon News : गावात अस्वच्छतेचा कहर माजला असून, मुख्य नाले व गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्यामुळे तुडुंब भरून वाहत आहेत.
त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाल्यांमध्ये कचऱ्यांचे ढिग साचल्यामुळे यावर मोकाट कुत्रे व डुकरांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढला असून, परिसरात रोगराई पसरली आहे. (people infected by Dengue like disease in jamathi jalgaon news)
परिसरातील नागरिकांना मलेरिया, टायफेड, डेंगी या सारख्या आजाराची लागण झाली तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन राहणार असून या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या घाणीपासून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. घरातील सांडपाणी थेट रस्त्यावरून पसरून सर्वत्र दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे राहणे मुश्किल झाले आहे.
रुग्णांच्या संख्येत वाढ
गावात अस्वच्छतेमुळे साथीचे आजार व डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करून गावात फाँगिंग मशीनने फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
आदेशाला केराची टोपली
लोणवाडी गावात अस्वच्छतेमुळे कहर माजला असून, ग्रा.पं.प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य विभागाने स्वच्छतेविषयी ग्रामपंचायतीकडे वारवांर पत्रव्यवहार केला आहे.मात्र ग्रा.पं.याकडे कानाडोळा करीत आहे.गावात साथीच्या रोगाची लागण झाल्यास ग्रामपंचायत याला जबाबदार असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.