MNS Campaign : ‘एक सही संतापाची’ला प्रतिसाद; लोकांच्या संतप्त भावना

Citizens signing in 'Ek Sahi Santapachi' initiative by MNS.
Citizens signing in 'Ek Sahi Santapachi' initiative by MNS. esakal
Updated on

MNS Campaign : राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसेने सुरू केलेल्या ‘एक सही संतापाची’ या मोहिमेस जळगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

राजकीय स्थितीविरोधात मनसेने विविध चौकांत लावलेल्या फलकांवर स्वाक्षरी करत नागरिकांनी आपले संतप्त अभिप्रायही नोंदविले. (people of Jalgaon have great response to Ek Sahi Santapachi campaign by mns jalgaon news)

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. आता गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात भूमिका घेत काही आमदारांसह राज्यातील सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

या बदललेल्या स्थितीत मनसेने आंदोलन चालविले असून, ‘एक सही संतापाची...’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा प्रारंभ शनिवारी (ता. ८) पक्षाचे निरीक्षक विनय भोईटे यांच्या हस्ते पहिल्या सहीने झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citizens signing in 'Ek Sahi Santapachi' initiative by MNS.
Jalgaon News : 6 महिन्यात 44 तरुणी प्रियकरासोबत सैराट; पाचोरा तालुक्यातील स्थिती

जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपनगराध्यक्ष आशिष सपकाळे, राजेंद्र निकम, विकास पाथरे आदी या वेळी उपस्थित होते. मु. जे. महाविद्यालय, काव्य रत्नावली चौक, नूतन मराठा, महापालिका इमारतीसमोर हे फलक लावले असून, त्यावर नागरिक संतप्त भावना व्यक्त करत अभिप्रायही नोंदवत आहेत.

या अभियानास दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. ९) चांगला प्रतिसाद मिळाला. याद्वारे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांबद्दल नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

Citizens signing in 'Ek Sahi Santapachi' initiative by MNS.
Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात 49 टक्के पेरण्या पूर्ण; कापसाचा पेरा सर्वाधिक...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.