Jalgaon News : सत्तरी गाठलेल्या जलतरणपटूंची तरुणांना लाजवणारी कामगिरी

Jalgaon's Adv. R. R. Patil and Satish Lunkad.
Jalgaon's Adv. R. R. Patil and Satish Lunkad.esakal
Updated on

Jalgaon News : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स स्पर्धेत जळगाव शहरातील आणि वयाची सत्तरी गाठलेल्यांसह तरुण जलतरणपटूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. मिळवून दिले आहे. ॲड. आर. आर पाटील यांच्यासह सतीश लुंकड या तरुणाने सुवर्णपदक पटकावले.

विविध क्रीडा स्पर्धांमधील जलतरणामध्ये खेळाडूंचे संघ सहभागी झाले होते. ( performance of swimmers who reached 70 puts youth to shame jalgaon news )

त्यात ॲड. पाटील आणि सतीश यांचा समावेश होता. सतीश यांनी शंभर, चारशे मीटर, फ्री-स्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी वयाची सत्तरी गाठलेले ॲड. पाटील यांनी शंभर मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक आणि शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक पटकावले.

कौतुकाचा वर्षाव

ॲड. पाटील हे हौशी जलतरणपटू असून वयाची सत्तरी गाठल्यावरही दररोज तासभर पोहण्याची त्यांची रोजनिशी आहे. पोलीस जलतरण तलावावरील प्रशिक्षक कमलेश नगरकर, कमल किशोर मणियार, राजेश नेवे, मनोज झोपे या प्रशिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन असते.

Jalgaon's Adv. R. R. Patil and Satish Lunkad.
Jalgaon News : एसडी-सीडच्या माध्यमातून ‘सुपर थर्टी’ची चाचणी घेणार : आनंद कुमार

उतारवयात आपला छंद जोपासून स्पर्धक वृत्तीमुळे जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांचे प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांना प्रोत्साहन असते. नाशिकमध्ये जळगावसाठी पदकांची कमाई केल्याने जळगावच्या जलतरणपटूंकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Jalgaon's Adv. R. R. Patil and Satish Lunkad.
Jalgaon News : प्रभाग कर्मचारी 1 भाग एकाचवेळी करणार स्वच्छ; आरोग्य निरीक्षकांना आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.