बाईऽऽऽगं... इथूनतिथून सगळे नवरे सारखेच..?

पैशांसाठी दोघींचा छळ; पतींसह सासरच्या मंडळींवर गुन्हा
Persecution of both for money
Persecution of both for moneyPersecution of wife
Updated on

जळगाव : दोन महिला एकत्र आल्या की, त्यांची पहिली प्रतिक्रिया असते, इथून तिथून सगळे नवरे सारखेच... अशीच काहीशी प्रचीती एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रारीला आलेल्या दोन विवाहितांना आली. एका विवाहितेला माहेरून पैसे आणले नाही म्हणून मारहाण व छळ सुरू होता. तर दुसऱ्या महिलेचा पती साडेतीन लाखांसाठी तिला मारझोड करत होता. अशा स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

शहरातील जोशीवाडा येथील माहेरवाशीण रेहानाबह कुरबान खान (वय २५) यांचा विवाह जळगावातीलच आझादनगर, पिंप्राळा येथील कुरबान खान इस्माईल खान याच्यासोबत झाला. सुरवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती कुरबान खान याने पत्नीकडे माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तगादा लावला. परंतु माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने माहेरून पैसे आणले नाहीत, त्याचा राग मनात धरून पती कुरबान खान इस्माईल खान, सासू फरिदा, सासरे इस्माईल खान, दीर शेरखान, सुभान आणि नणंद सुलतानाबी हसन खान (सर्व रा. आझादनगर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवऱ्याला हवे साडेतीन लाख

रामेश्वर कॉलनीतील श्रद्धा तुषार हिप्पर (वय २३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार हिप्पर यांच्याशी झाला. नंतर पती तुषार याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. परंतु माहेरची परिस्थिती हलाखीची असल्याने विवाहितेने पैसे आणले नाहीत म्हणून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पती तुषार, सासू मंगलाबाई, सासरे ज्ञानेश्वर आणि अक्षय हिप्पर (सर्व रा. मनमाड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय धनगर करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()