Jalgaon Accident News : मुलीचा गणवेश घ्यायला गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

Accident News
Accident Newsesakal
Updated on

Jalgaon Accident News : शाळकरी मुलीचा गणवेश घेण्यासाठी गेलेल्या पित्याचा दुभाजकावर दुचाकी आदळल्याने मृत्यू झाला. ही घटना शहरातील महापालिकेसमोर मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

मिलिंद सोमनाथ पवार (वय ४६, रा. शाहूनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (person died in bike accident jalgaon news)

शाहूनगरातील रहिवासी मिलिंद पवार हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मिलिंद पवार मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या मित्राच्या दुचाकी (एमएच १९, सीपी ९९४६)वरून टॉवर चौकाकडून नेहरू पुतळ्याकडे जात होते. या वेळी अचानक त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीचा धक्का लागला.

यात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी दुभाजकावरील विद्युत डीपीच्या खांबावर आदळली. या अपघातात डीपीचा लोखंडी खटक्याचा फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे असलेल्या पोलिसांचे चार्ली पथकातील चारुदत्त पाटील आणि भरत पाटील यांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident News
Balasore Train Accident: ओडिशा ट्रेन अपघाताच्या सीबीआय तपासानंतर JE आमिर खान फरार? जाणून घ्या काय आहे सत्य

दरम्यान, खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. मृत मिलिंद पवार यांच्या पश्चात आई सिंधूबाई, वडील सोमनाथ पवार, भाऊ मनोज व किशोर, पत्नी सुनंदा आणि तीन मुली असा परिवार आहे. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’

महापालिकेसमोरच दुभाजकावर लावलेल्या जाळ्यांचे पाइप तुटून ते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांत अडकून अपघात घडतात. याच विद्युत डीपीच्या खटक्याला धडकून यापूर्वी एकाचा मृत्यू झाला आहे. याच डीपीच्या उघड्या दारांमुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघाताला सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, गणवेश घेण्यासाठी आलेल्या मिलिंद पवार यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा होता. बेपर्वाई करणाऱ्या ‘महावितरण’विरोधात तक्रार दाखल करावी, या मागणीसाठी कुटुंबीयांसह नागरिकांची पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती.

Accident News
Accident: मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसली अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.