भुसावळ (जि. जळगाव) : येथील पालिका (Bhusawal Municipality) हद्दीत प्रारूप प्रभागरचनेच्या तक्रारीसंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी हरकत घेऊन प्रभागरचनेतील (Ward Formation) त्रुटी दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. (Petition in bench regarding ward structure errors of Bhusawal Municipality jalgaon News)
येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२१ - २०२२ ची प्रारूप प्रभागरचना सक्षम प्राधिकारी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी १० मार्चला या संदर्भात विभिन्न परिशिष्ट प्रकाशित केले होते. तर ६ जूनला सचिव, राज्य निवडणूक आयोग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व नवनिर्मित असा एकूण २०७ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभागरचना कार्यक्रम २०२२ च्या संदर्भात सूचित केले होते. १२ जूनला याचिकाकर्ते येथील इलियास इक्बाल मेमन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रारूप प्रभागरचनेच्या प्रभाग क्रमांक १५ बद्दल हरकत घेतली होती.
मुख्यत्वेकरून भौगोलिक सलगता ठेवली नसल्यामुळे, उचित सीमांकन न केल्यामुळे, स्थळ परीक्षण व पडताळणी याचिकाकर्ते समोर करणे तसेच शहरातील अनेक प्रभागातील प्रारूप प्रभागरचना चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हरकत घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांना सुनावणीची नोटीस दिली होती. परंतु त्यानंतर योग्य सुनावणीची संधी न देता तसेच कुठल्याही प्रकारचा निर्णय कळविण्यात आला नव्हता.
हरकतींवर सुनावणीची संधी द्यावी
सक्षम प्राधिकाऱ्यांनी ८ जूनला अंतिम प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली होती. म्हणून याचिकाकर्ता यांनी घेतलेल्या हरकतीवर योग्य ती सुनावणीची संधी देऊन तसेच निर्णय पारित करून सुचित करण्यासाठी खंडपीठात सचिव, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्याविरुद्ध अॅड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.