Jalgaon : पेट्रोलपंपाच्या मॅनेजरने लावला मालकाला चुना

Fraud News
Fraud Newsesakal
Updated on

जळगाव : पुतणीच्या लग्नासाठी ८ लाख रुपये घेऊन तसेच पेट्रोलपंपाच्या (Petrol Pump) व्यवहारात मॅनेजरने अफरातफर करून मालकाला चक्क १२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा चुना (Fraud) लावल्याची घटना उघडकीस आली. शहर पोलिस ठाण्यात मॅनेजरसह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Petrol pump manager fraud owner Jalgaon Crime News)

शहरातील गिरणा पाटबंधारे कॉलनीतील संतोष काशिनाथ वसंतकर (वय ४४) शेतकरी असून त्यांच्याकडे रावेर येथे कोको रावेर श्रीकृष्णा व पाल येथे जे. एस. तडवी ॲण्ड सन्स नावाने पेट्रोल पंपाची मालकी आहे. पाल येथील पेट्रोल पंप दुसऱ्याला चालविण्यास दिला असून याठिकाणी मच्छिंद्रनाथ तुकाराम कातरे (रा. लोणी बहादरपुर, ता. जि. बुऱ्हाणपुर मध्यप्रदेश) हे मॅनेजर म्हणून कामाला होते. मच्छिंद्रनाथ कातरे हे पेट्रोलपंपाचा दैनंदिन भरणासह संपूर्ण व्यवहारांचा हिशोब चोख ठेवत असल्याने मालकाचा त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. कातरे यांच्या पुतणीचे ३ एप्रिल रोजी लग्न असल्याने त्याने संतोष वसंतकर यांच्याकडे ८ लाख रुपये मागितले होते.

परंतु वसंतकर यांनी ‘तुला एवढे पैसे कसे काय देवू’, असे म्हटले, असता, त्यांनी माझ्या भावाचे पैसे येणार असून तेव्हा तुम्हाला देवून टाकू अशी खात्री दिली. वसंतकर यांनी त्याला स्टॅम्प करून दे असे सांगताच मच्छींद्र याचा भाऊ राजाराम तुकाराम कातरे यांनी स्टॅम्पची गरज नसून त्यांनी आठ लाख रुपयांचे दोन धनादेश सुरक्षेपोटे त्यांना दिले होते. महिनाभरानंतर मच्छींद्र हा पैसे परत करणार होता. परंतु त्याला बऱ्याचदा पैसे मागितले तरी तो टाळाटाळ करीत होता. यावेळी पेट्रोलपंप मालक यांना कातरे यांच्या व्यवहारावर संशय येवू लागल्याने त्यांनी पाल येथील पेट्रोल पंपाचे दप्तर घरी नेवून तपासणी केली.

भावाच्या मदतीने केला अपहार

दप्तर तपासणीत मॅनेजर मच्छिंद्रनाथ कातरे याने पेट्रोलपंपाच्या हिशोबातील ओपनिंग व क्लोजिंग बॅलेन्समध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तर पेट्रोल पंपावरील मिटर रिडींगमध्ये फेरफार करून डिझेलची विक्री कमी दाखवत. त्याने आपला भाऊ प्रवीण कातरे याच्या मदतीने सुमारे ४ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

Fraud News
यंदा छत्र्या, रेनकोटही महाग; किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ

मॅनेजरसह दोघ भावांविरुद्ध गुन्हा

मॅनेजर मच्छिंद्र कातरे, राजाराम कातरे, प्रवीण कातरे, तेली हे गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ आले होते. याठिकणी पेट्रोलपंप मालक संतोष वसंतकर यांनी कातरे यांनी घेतलेले ८ लाख रुपये व पेट्रोलपंपाच्या हिशोबात केलेल्या अपहाराबाबत विचारणा केली. यावर कातरे याने वसंतकर यांना उडवाउडवीची उत्तरे देत तुमच्याकडून काय होईल, ते करून घ्या मी पैसे देणार नाही असे म्हणत तेथून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच संतोष वसंतकर यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मॅनेजर मच्छींद्र कातरे त्यांचा भाऊ राजाराम कातरे व प्रवीण कातरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रवींद्र सोनार करीत आहे.

Fraud News
नाशिक : प्रतीकात्मक अंत्ययात्रेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.