Sand Smuggling : अरेच्चा! अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी चक्क रस्त्यात खोदले खड्डे

illegal sand transport
illegal sand transportesakal
Updated on

धरणगाव : बांभोरी नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक होऊ नये, यासाठी महसूल प्रशासनाने वेगळी शक्कल लढवली आहे. नदीपात्रातील चोरवाटांचा शोध घेऊन महसूल प्रशासनाने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. हे खड्डे बुजल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिला आहे.

illegal sand transport
Electric Scooter : फक्त 6 पैशात 1 किमी धावणार 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा काय आहेत फीचर्स

बांभोरी नदीपात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांनी वाहतुकीसाठी चोरवाटा तयार केल्या होत्या, याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अमोल पाटील, तलाठी गजानन बिंद्वाल व कोतवाल नारायण सोनवणे यांनी जेसीबीद्वारे खड्डे खोदून वाटा बंद केल्या आहेत.

illegal sand transport
VIDEO : फुकटात कार्यकर्त्यांना चहा पाजणं भाजप आमदाराच्या अंगलट; भररस्त्यात अडवला चहावाल्यानं ताफा!

हे खड्डे पुन्हा वाळूमाफियांनी बुजल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिले आहेत. यामुळे रात्री-बेरात्री होणाऱ्या अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी वाढलेली आहे. अशा वाहतूक करणाऱ्यांची वाहनेदेखील अनेक वेळा प्रशासनाने जप्त केली आहेत. मात्र या वाहनांवरचा दंडदेखील भरला जात नाही, अशा वाहनांचा प्रशासनामार्फत २२ ला लिलाव होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()