Jalgaon News : बिलाखेड भागात साकारतेय ‘ऑक्सिजन बेट’; वन विभागाच्या संकल्पनेतून रोपांची लागवड

During plantation 
MP Unmesh Patil, Deputy Superintendent of Police Abhay Singh Deshmukh, Sub Divisional Officer Pramod Hille
During plantation MP Unmesh Patil, Deputy Superintendent of Police Abhay Singh Deshmukh, Sub Divisional Officer Pramod Hilleesakal
Updated on

Jalgaon News : वन विभागाच्या संकल्पनेतून राबविलेल्या 'माझे रोप माझी जबाबदारी' या मॉडेल प्रयोगातून ३५०० झाडांची रोपे लावून नवे आॕक्सिजन बेट फुलविण्यात येणार आहे.

या मोहिमेस सोमवारी (ता. ३१) मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून प्रारंभ झाला. बिलाखेड परिसरातील ५० एकर जागेत रोपांची लागवड करण्यात येणार आहे. (Plantation of 3500 saplings in 50 acres from concept of Forest Department jalgaon news)

या वेळी व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, पोलिस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, स्वयंदिप दिव्यांग महिला परिवाराच्या प्रमुख मीनाक्षी निकम, देवरे फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील, पोद्दार शाळेचे मुख्याध्यापक अजय घोरपडे, जिजाबराव वाघ, गर्व्हन्मेंट काॕन्टक्ट्रर राज पुंन्शी, सुशील जैन, केंद्रप्रमुख विनायक ठाकूर, धनंजय गायकवाड, दीपक देशमुख, भास्कर नगराळे, सुलोचना इंगळे, प्रितेश कटारिया आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी उपक्रमाचे महत्त्व समाजावून सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेताना शीतल नगराळे यांनी शहरातील १८ शाळांमध्ये आठ महिन्यांपूर्वी १५ हजार देशी झाडांच्या बियांसह त्या रुजविण्यासाठी पिशव्यांचे वाटप केले होते. नुकतेच विद्यार्थ्यांनी फुलविलेल्या या रोपांचे संकलन करून अशी ३५०० झाडांची रोपे लावली जाणार आहेत.

खासदार उन्मेष पाटील यांनी ‘माझे रोप माझी जबाबदारी’ हा राज्याला दिशादर्शक ठरावा, असा पथदर्शी उपक्रम असल्याचे सांगताना लोकसभागाचे बळ त्याला मिळाले. ही खरोखरच अभिंनदनीय बाब असल्याचे नमूद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

During plantation 
MP Unmesh Patil, Deputy Superintendent of Police Abhay Singh Deshmukh, Sub Divisional Officer Pramod Hille
Jalgaon Municipal Commissioner : कोट्यवधींची विकासकामे, मग खोडा कसा? : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनीही या प्रयोगाचे कौतुक केले आहे, असेही खासदार पाटील यांनी आवर्जून सांगितले. प्रमोद हिले, अभयसिंह देशमुख, संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध शाळांमधील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

शासनाच्या २० लाखांची बचत

या मोहिमेत ३५०० रोपे लावण्यासाठी रोटरी क्लब, पोलिस विभाग व वनविभागाच्या कर्मचा-यांनी श्रमदानातून खड्डे खोदली. यामुळे जवळपास ५ लाख तर साडेतीन हजार रोपे लागवड करण्यासाठी लागणारे १५ लाख अशा शासनाच्या २० लाख रुपयांची बचत लोकसहभागामुळे होऊ शकली.

यासाठी शहरातील सामाजिक संस्था, उद्योगपती व कंपनी यांचे आर्थिक बळ मिळाल्याचे शीतल नगराळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, चाळीसगाव वन विभागातील कर्मचा-यांनी पदरझळ सोसून हा प्रयोग फुलण्यासाठी ४५ हजार रुपये जमा केले. भास्कर नगराळे यांच्यासह या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

During plantation 
MP Unmesh Patil, Deputy Superintendent of Police Abhay Singh Deshmukh, Sub Divisional Officer Pramod Hille
Jalgaon NMU News : बी.एस्सी. कॉम्प्युटरसह बीसीए प्रवेशसंख्या वाढ; ‘उमवि’च्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.