PM Awas Yojana : घरकुलाची कामे न करणाऱ्या लाभार्थ्यांविरुद्ध धडक कारवाई

Pradhan mantri Awas yojna
Pradhan mantri Awas yojnaesakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : येथील पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) अनेक लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही घरकुलाचे काम सुरू केलेले नाही.

अशा लाभार्थ्यांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (pm awas yojana Action taken against beneficiaries whose Gharkul work has not been started jalgaon news)

योजनेचा लाभ व हप्ता घेऊन घरकुलाची कामे न करणाऱ्या लाभार्थ्याविरुद्ध कारवाईची धडक मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी दिला आहे.

पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या २०१६ ते २०२२ या काळातील घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला असला तरी अजूनपर्यंत ६७७ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केलेले नाही.लाभार्थ्यांना वेळोवेळी लेखी पत्र, समज व नोटिसा देण्यात आल्या. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे घरकुलाचे काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून. त्यात एम. एस. भालेराव, अमोल पाटील, डी. बी. सुरवाडे, राजकुमार धस, आर. एस. गढरी, ग्रामसेवक, गृहनिर्माण अभियंता यांचा समावेश आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Pradhan mantri Awas yojna
Jalgaon News : पत्नीचा गळा चिरणाऱ्या पतीला जन्मठेप

या पथकाने प्रत्येक गावात जाऊन घरकुल योजना, लाभार्थी व योजनेच्या पहिल्या हप्त्याचा निधी यासंदर्भात चौकशी केली असून, नगरदेवळा, लोहारा, पिंपळगाव बुद्रुक, कळमसरा, वडगाव खुर्द, लासगाव येथील ११६ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन अनेक वर्ष उलटली तरी घरकुलाचे काम सुरू न केल्याचे निदर्शनास आल्याने या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत ग्रामसेवकांना आदेशित करण्यात आल्याने ग्रामसेवकांनी त्या संदर्भातील पत्र पोलिस ठाण्यात दिले आहे.

यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, कारवाई फौजदारी स्वरूपाची कारवाई टाळण्यासाठी घरकुल योजनेचा पहिला हप्ता घेतलेल्या लाभार्थ्यांनी त्वरित घरकुलाची कामे सुरू करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Pradhan mantri Awas yojna
Maha Vikas Aghadi : मविआच्या आंदोलनामुळे आशा पल्लवित; महामार्ग दुरुस्ताचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.