जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावमध्ये आहेत. लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमासाठी मोदी जळगावमध्ये आले आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या जळगावमधील दुर्घटनेतील मृत लोकांबाबत दु:ख व्यक्त केले.
मोदी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राचे संस्कार भारतात नाही तर जगात पसरले आहेत. पोलंडमध्ये एक कोल्हापूर मेमोरियल बांधण्यात आले आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांच्या सन्मानासाठी बांधले आहे. त्याठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांचे सेवाभाव ऐकायला मिळाले. त्यावेळी मला अभिमान वाटत होता, असं मोदी म्हणाले.