Jalgaon News : कुर्बानीसाठी आणलेले ३२ गोऱ्हे ताब्यात; 6 संशयितांना अटक

Police arrested six suspects along with 32 bullocks jalgaon crime news
Police arrested six suspects along with 32 bullocks jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील उस्मानिया पार्क मोगल गार्डन भागात ईद कुर्बानीसाठी आणलेल्या ३२ गोऱ्हे-बैलांसह सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली.

उस्मानिया पार्क मोगल गार्डन भागात मंडप टाकून जनावरांची सार्वजनिकरित्या कुर्बानी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांना मिळाली. (Police arrested six suspects along with 32 bullocks jalgaon crime news)

त्यावरून शहर पोलिस ठाण्यातील रवींद्र बागूल, किशोर पवार, भरतसिंग पाटील, ज्ञानेश्वर उन्हाळे यांनी घटनास्थळी धडक दिली.

परिस्थितीची जाणीव येताच वरिष्ठांना घटनेची माहिती देत अतिरीक्त पोलिस बल मागविण्यात आले. परिसरातील कादरीया मशिदीसमोरील मोकळ्या पटांगणात मंडप टाकून गोऱ्हे-बैलांची कुर्बानी करण्यात येत असतानाच पोलिसांनी छापा टाकला.

घटनास्थळावरून वकार युनूस मोईद्दीन शेख (वय २९, रा. मोहंमदियानगर), इम्रान खान रहेमान खान पठाण (वय ३८, रा. मुगल गार्डन), दानिश शेख इरफान (वय २१, उस्मानिया पार्क), सय्यद शाहीद सय्यद यासीन (वय ३२, भिलपुरा), जावेद शेख रशिद शेख (वय ३४, मुगल गार्डन), मोहंमद अय्युब हकीमोद्दन खान (वय ३२) या सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police arrested six suspects along with 32 bullocks jalgaon crime news
Jalgaon ZP School : पहिलीची पटसंख्या देतेय धोक्याची घंटा; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

घटनास्थळावर पोलिसांना ३२ लहान-मोठे आणि वेगवेगळ्या जातीचे बैल-गोऱ्हे कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले. सोबतच १०५ किलो मटण जप्त करण्यात आले. पशुवैद्यकीय खात्याचे डॉ. गणेश वामन भांडारकर, डॉ. नीलेश अशोक चोपडे यांना पाचारण करून रितसर पंचनामा करून जनावरांच्या मांसाचे नमुने घेण्यात आले.

आरोग्य निरीक्षक संतोष बेंडवाल, रवींद्र बाविस्कर यांच्या ताब्यात मांस देण्यात आले, नंतर ते पोलिस बंदोबस्तात नष्ट करण्यात आले. ३२ जनावरांना कुसुंबा येथील रतनलाल बाफना गो-शाळेत रवाना करण्यात आले. याबाबत पोलिस कर्मचारी नरेंद्र ठाकरे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अटकेतील सहा संशयितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ (सुधारित-२०१७) चे कलम ५, ५ क, ९ सह इतर कलमान्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Police arrested six suspects along with 32 bullocks jalgaon crime news
Jalgaon News : पोलिस उपअधीक्षक येरूळे ठरले ‘देवदूत’; वाचविले तिघांचे प्राण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.